Wednesday, May 1, 2024
घरमानिनीWorld Liver Day 2024: लिव्हर डिटॉक्ससाठी आहारात करावा या पदार्थांचा समावेश

World Liver Day 2024: लिव्हर डिटॉक्ससाठी आहारात करावा या पदार्थांचा समावेश

Subscribe

दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो. यकृत म्हणजे लिव्हर हा शरीराचा महत्वाचा अवयव असून अनेक महत्वाची कार्ये हा अवयव करत असतो. लिव्हरमध्ये समस्या निर्माण झाल्यास आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. यामुळे लिव्हर निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी वेळोवेळी लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करणे आवश्यक आहे. त्याकरता आहारात काही ठरविक पदार्थांचा समावेश करून यकृत नैसर्गिकरित्या डिटॉक्स केले जाऊ शकते.

लिव्हरचे काम हे अन्नाचे पचन करणे, व्हिटॅमिन डी सक्रिय करणे, रक्त फिल्टर करणे, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे आणि अनेक आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे साठवण्याचे आहे. पोटात शरीराला घातक पदार्थ साचल्यास त्याचा यकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे ॲलर्जी, बद्धकोष्ठता, पचन आणि थकवा अशा अनेक समस्या उद्भवतात. या समस्या दीर्घकाळ राहिल्यास हिपॅटायटीस, सिरोसिस, कावीळ आणि कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो, त्यामुळे यकृताचे वेळोवेळी डिटॉक्सिफिकेशन करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असतात. जे रक्तातील घाण शोषून घेण्याचे काम करतात. पोट साफ करण्यासाठी विशेषतः पालक, मोहरी, आणि धणे यांचा आहारात समावेश करावा.

- Advertisement -

हळद

हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन यकृताच्या पेशींची दुरुस्ती करते आणि त्यांच्यामध्ये साचलेली घाण काढून टाकण्याचे काम करते. हळदीचे सेवन यकृतामध्ये जमा झालेली चरबी काढून टाकण्यासाठी देखील प्रभावी आहे.

व्हिटामीन सी

लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते, जे केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास देखील मदत करते. यासाठी द्राक्षे, संत्री, लिंबू या फळांचा आहारात समावेश करा. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट यकृताची सूज कमी करतात.

लसूण

लसणामध्ये सल्फर असते, जे यकृताची स्वच्छता करते.

ग्रीन टी

यकृत स्वच्छ करण्यासाठीही ग्रीन टी खूप फायदेशीर आहे. त्यात वनस्पती-आधारित अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्याला कॅटेचिन म्हणतात, जे केवळ यकृताच्या कार्यात मदत करत नाहीत तर अतिरिक्त चरबी कमी करतात. यामुळे दैनंदिन जीवनात या पदार्थांचा समावेश करावा.


Edited By

Aarya joshi

- Advertisment -

Manini