‘या’ Fiber Foods चा वापर करून तुमचं डाएट बनवा हेल्दी!

‘या’ Fiber Foods चा वापर करून तुमचं डाएट बनवा हेल्दी!

फास्ट लाईफ स्टाईल जगत असताना कित्येकदा घरचं पौष्टिक जेवण खाण्यास तितकासा निवांत वेळ काहींना मिळत नाही. त्यामुळे बऱ्याचदा ते फास्ट फूडचा पर्याय निवडतात. यासह दररोजच्या आहारात आपण नवनवीन पदार्थ तयार करून खात असतो. मात्र आपण जे रोज खातो ते आपल्या शरीरास कितपत योग्य किंवा पौष्टीक आहे. कमी वेळात उपलब्ध होणारे फास्टफूड अर्थात जंकफूड खाण्यामध्ये ती पोषक घटक नसतात ती आपल्याला आपल्या घरच्या जेवणातून मिळतात. यामुळे कित्येक आजारांचा सामना करावा लागतो. आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी आवश्यक पोषक घटक म्हणजेच फायबर युक्त घटकांचा समावेश आपल्या रोजच्या आहारातून व्हायला हवा. सॉल्युबल फायबर आणि दूसरं इनसॉल्युबल फायबर हे दोन्ही घटक हेल्दी डाएटमधून आपल्याला मिळतात.

फायबरयुक्त घटक पचनक्रिया मजबूत करते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी, हृदय निरोगी ठेवण्यास, आपण फायबर युक्त आहार घेणं आवश्यक आहे. याशिवाय वजन कमी करणे, चमकणारी त्वचा मिळविणे आणि बोवेल सिंड्रोमपासून सुटका होण्यासाठी फायबर देखील खूप महत्वाचे आहे. आहारात फायबरयुक्त असलेल्या अन्न पदार्थांचा समावेश केल्यास बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटाच्या इतर समस्या उद्भवत नाहीत. म्हणून, दैनंदिन आहारात फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे.


 

First Published on: July 17, 2021 7:07 PM
Exit mobile version