आरोग्यदायी ‘आंबा’

आरोग्यदायी ‘आंबा’

आरोग्यदायी 'आंबा'

उन्हाळा सुरु होताच बाजारात दाखल होणारा फळांचा राजा म्हणजे आंबा. उन्हाळा कितीही त्रासदायक, नकोसा आणि कंटाळवाणा वाटला तरी आंब्यासाठी तो हवाहवासा वाटतो. आंब्याच्या विविध पदार्थांचा आस्वाद आपण घेऊ शकतो. तसेच आंबा हा आरोग्यासाठी लाभदायक देखील ठरतो.

पोषक घटकांचा समावेश

आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे उन्हाळ्यात आंबा खाणे फायदेशीर ठरते.

शरीरास ऊर्जा मिळते

आंब्यात शर्करा असल्याने आंब्यापासून शरीरास मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. त्यामुळे आंब्याचे सेवन केल्याने अॅक्टीव्ह रहाण्यास मदत होते. उन्हाळ्यात आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणे अधिक फायदेशीर ठरते.

चेहऱ्यावर चमक येते

आंब्यात व्हिटॉमिन सी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर चेहऱ्यावरची चमक देखील वाढते आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तर आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असतात.

दृष्टी सुधारते

आंब्यामुळे शरीराला व्हिटामिन ए, बीटा कॅरोटिन आणि अल्फा कॅरोटिन यांचा मुबलक पुरवठा होतो. यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि दृष्टी देखील उत्तम राहते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

फिजिशियनच्यामते, एक सर्वसाधारण आकाराचा आंबा हा बटर किंवा बदामांपेक्षा अधिक पौष्टिक आहे. आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू (उत्ती) आणि स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

हृदयविकार कमी होतो

आंबे हे ‘व्हिटामिन बी ६’, ‘व्हिटामिन सी’ आणि ‘व्हिटामिन ई’ यांनी परिपुर्ण असतात. तसेच ‘व्हिटामिन सी’ मुळे शरीरात अपायकारक रॅडीकल्सशी सामना करण्याची क्षमता वाढते. ‘व्हिटामिन बी६’ मुळे रक्तातील ‘होमोसेस्टीना’चे प्रमाण संतुलित राहते आणि हृद्यविकाराचा धोका कमी होतो.

First Published on: May 8, 2019 7:30 AM
Exit mobile version