रिअल ब्युटी

रिअल ब्युटी

Beauty Products

बाजारातील सौंदर्य प्रसाधने महागडी असतात. त्याची खरेदी परवडण्यापलिकडे असते. अशा वेळी स्वस्तात मिळणारी सौंदर्य प्रसाधने खरेदी केली जातात; पण त्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा परिस्थितीत घरच्या घरी तयार होणारी सौंदर्य प्रसाधने एक अनोखे सौंदर्य प्रदान करीत असते, हे सत्य नाकारता येत नाही. कारण ही प्रसाधने स्वस्त, शुद्ध आणि नैसर्गिक गुण असणारी आहेत. त्याचा वापर तुम्ही नि:संकोच करू शकता.

क्लिंजर-
चार चमचे दही आणि एकदोन चमचे लिंबाचा रस एकत्र करून घ्या. कापसाच्या सहाय्याने चेहरा आणि मानेला खालून वरच्या दिशेला लावा आणि नंतर कापसाने पुसून घ्या. हे तेलकट त्वचेसाठी चांगले क्लिंजर आहे.

अ‍ॅस्ट्रिंजेंट-
चार चमचे काकडीचा रस आणि दोन चमचे गाजराचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे फ्रेशनेसचे काम करते.

हँड अ‍ॅण्ड बॉडी लोशन-
गुलाब जल, दोन चमचे ग्लिसरीन, अर्धा चमचा सिरका, अर्धा चमचा मध, व्यवस्थित मिक्स करून एका बाटलीत भरून ठेवा. स्नानानंतर हात आणि संपूर्ण शरीरावर लावा. त्याने त्वचा स्वच्छ आणि मुलायम बनते.

हेअर डाय-
एक लीटर पाण्यात आवळा 25 ग्रॅम, ब्राह्मी बुटी 55 ग्रॅम चोवीस तास भिजवून ठेवावे. एक किलो तिळाच्या तेलात हे पाणी हाताने एक जीव करा आणि गाळून तेलात टाकून इतके गरम करा की पाण्याची वाफ होऊन त्यातील पाण्याचा अंश नाहीसा होईल. तेल थंड करून बाटलीत भरून ठेवा. त्या व्यतिरिक्त रोज रात्री एक एक चमचा आवळा, हरडा आणि बेहेडा 750 मिली पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी याच पाण्याने केस व्यवस्थित धुवा. हे एक चांगले गुण असणारे हेअर डाय आहे.

First Published on: January 12, 2019 5:44 AM
Exit mobile version