वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

Weight loss

* भाजी आणि फळांमध्ये कॅलरी कमी असतात त्यामुळं त्यांचे सेवन जास्त प्रमाणात करावे. केळ आणि चिकू कमी प्रमाणात खावे कारण त्याने लठ्ठपणा वाढतो.

* जेवताना टॉमेटो आणि कांदाच्या कोशिंबीरमध्ये मिरे आणि मीठ घालून खावे. त्यानं शरीराला विटामिन सी, ए, के, लोह, पोटॅशिअम, लायकोपिन आणि ल्यूटिन मिळतं.

* ताज्या पुदिन्याच्या पानांची चटणी करून चपातीसोबत खावी. पुदिन्याचा चहा प्यायल्यास वजन नियंत्रित राहतं.

* जेवणापूर्वी गाजर खावे. जेवणापूर्वी गाजर खाल्यास भूक कमी होते.

* एका कपात उकळत्या पाण्यात अर्धा चमचा बडिशेप टाका. १० मिनिटं त्याला झाकून ठेवा. थंड झाल्यानंतर ते पाणी प्यावं. तीन महिने असे नियमित केल्यास वजन कमी होते.

* हिरडा आणि बेहड्याचं चूर्ण बनवा. एक चमचा चूर्ण ५० ग्रॅम परवलच्या रसासोबत नेहमी घ्या, वजन मोठ्या प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होईल.

कारल्याची भाजी खाल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

* शेवग्याचा नियमित वापर केल्यास वजन नियंत्रित राहतं.

* सुंठ, दालचिनीच्या साली आणि काळी मिरे (३-३ ग्राम) बारीक करून चूर्ण बनवावं. सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी हे चूर्ण खावं.

* पपई नियमितपणे खावी. पपई सगळ्या सीजनमध्ये मिळते. खूप दिवस पपई खाल्ल्यास कंबरेची चरबी कमी होते.

* जेवणामध्ये दही खाल्ल्यास चरबी कमी होते. ताकही दिवसांतून दोन-तीन वेळा प्यावं.

* आवळा आणि हळद समप्रमाणात घेऊन बारीक चूर्ण करावं. हे चूर्ण ताकासोबत घेतल्यास कंबर एकदम सुबक होते.

* लेंडी पिंपळी बारीक करून कपड्यावर साफ करावी. हे चूर्ण तीन ग्राम नेहमी ताकासोबत घ्यावं त्यानं बाहेर आलेलं पोट कमी होतं.

* मुळांचा रस आणि मध सम प्रमाणात पाण्यासोबत मिसळून प्यावा, असं केल्यानं एक महिन्यात लठ्ठपणा कमी होतो.

* नेहमी सकाळी एक ग्लास पाण्यात दोन चमचे मध मिसळून प्यावा, असं केल्यानं चरबी कमी होते.

* कोबीचा ज्यूस प्यावा, याने सुध्दा चरबी कमी होते.

* एक चमचा पुदीन्याच्या रसामध्ये २ चमचे मध मिसळून प्यायलास लठ्ठपणा कमी होतो.

* सकाळी उठल्यावर २५० ग्राम टोमॅटोचा रस २-३ महिने नियमित प्यावा चरबी कमी होण्यास मदत होते.

First Published on: October 29, 2018 12:41 AM
Exit mobile version