मुलांच्या तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीकडे करू नका दुर्लक्ष

मुलांच्या तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीकडे करू नका दुर्लक्ष

तोंडातून दुर्गंधी येणे एक सामान्य समस्या आहे. काहीवेळेस खाल्ल्यानंतर त्याचे अन्नकण हे दातात अडकतात. त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. काही लोकांमध्ये ही सामान्य समस्या आहे. काही मुलांच्या तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. यामागे काही कारणे असू शकतात. मुलं अशा काही गोष्टी खातात त्यामुळे त्यांच्या तोंडात बॅक्टेरिया निर्माण होतात. मात्र ब्रश केल्यानंतर ही समस्या दूर होऊ शकते. तरीही जर मुलांच्या तोंडातून दुर्गंधी येते तेव्हा सावध व्हावे. यामागे काही कारणे असू शकतात. (bad breath in kids)

मुलांच्या तोंडातून दुर्गंधी येण्यामागील एक कारण म्हणजे ड्राय माउथ. जेव्हा मुलाच्या तोंडात लाळ कमी निर्माण होते तेव्हा तोंड सुकते आणि त्यामुळे बॅक्टेरिया शरिरात अधिक वेळ राहतात. त्यामुळेच मुलांच्या तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. या व्यक्तिरक्त मुलांना तोंडात बोटं टाकण्याची सवय असते. यामुळे त्यांचे तोंड ड्राय होऊ लागते. काही वेळेस आरोग्यासंबंधित औषधं घेतल्याने सुद्धा मुलांचे तोंड ड्राय होते.

या व्यतिरिक्त ओरल हाइजीन मेंटेन न केल्याने सुद्धा मुलांच्या तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. जेव्हा मुलं आपले तोंड किंवा दात व्यवस्थितीत स्वस्थ करत नाही तेव्हा त्यांच्या तोंडातून दुर्गंधी येते. त्यामुळे मुलाल दररोज ब्रश करण्याची सवय लावा. मुलं ब्रश करायला कंटाळा करत असतील तर त्यांना फन अॅक्टिव्हिटी म्हणून ब्रश करण्यास सांगू शकता.

दातांसोबत जीभेची सुद्धा स्वच्छता करणे फार महत्त्वाचे असते. दुर्गंधी जीभेच्या कारणास्तव बॅक्टेरिया तोंडात राहतात. त्यामुळे हिरड्यांना त्रास होण्यास सुरुवात होते. त्याचसोबत कॅविटीची समस्या उद्भवते. त्याचसोबत मुलांच्या तोंडातून दुर्गंधी येण्याचे कारण साइनसाइटिस आणि टॉन्सिलाइटिस सुद्धा असू शकते. तसेच पोटात इंन्फेक्शन झाल्यास तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. असे झाल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.


हेही वाचा- मुलांची उंची वाढवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

First Published on: August 7, 2023 6:32 PM
Exit mobile version