टाईट जीन्सचे वाईट परिणाम

टाईट जीन्सचे वाईट परिणाम

आजकाल कोणी जीन्स घालत नाही असा व्यक्ती सापडणे तसे कठीण आहे. जवळपास सगळ्यांचाच वॉडरोबमध्ये जीन्स असतेच. जीन्समुळे स्टायलिश लूक तर मिळतोच शिवाय त्यात कॅम्फरटेबलही वाटते. पण असे असले तरी अनेक जणांना प्रमाणाच्या बाहेर टाइट जीन्स घालण्याची सवय असते. जी शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. टाइट जीन्समुळे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात. फॅशनच्या नादात आपण स्वतःच अशा जीन्स घालून अनेक आजारांना निमंत्रण देत असतो.

टाईट जीन्सचे परिणाम –

डॉक्टरांच्या मते, टाइट जीन्स घालणाऱ्या व्यक्तीच्या ब्लड सर्क्युलेशनवर विपरीत परिणाम होतो. टाइट जीन्समुळे पायाच्या नर्व्ह आणि मसल्स ब्लॉक होण्याची शक्यता असते. या ब्लॉकिंगमुळे पाय आणि मांड्यामध्ये तीव्रतेने सुन्नपणा जाणवतो. परिणामी, मुंग्या येण्याची समस्या उदभवते.

अधिक टाइट फिटिंग जीन्समुळे ब्लड सर्क्युलेशनवर परिणाम होत असल्याने अस्वथ्य वाटू लागते. अशावेळी हृदयावर रक्त पंप करून इतर अवयवांपर्यत पाठवण्यासाठी प्रेशर निर्माण होते, ज्यामुळे हार्ट प्रोब्लेमचा धोका निर्माण होतो.

टाइट जीन्स घातल्याने त्वचेच्या संसर्गाला तुम्ही बळी पडू शकता. खरं तर, जेव्हा तुम्ही टाइट जीन्स घालता तेव्हा जीन्सचे कापड त्वचेला चिकटते आणि पुरळ आणि सूज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आता उन्हाळा सुरु आहे अशा दिवसात तुम्ही अधिक टाइट जीन्स घातली तर येणारा घाम सुकत नाही. परिणामी, खाज सुटणे आणि लालसरपणाची समस्या उदभवते.

टाइट जीन्स घातल्याने केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. घट्ट जीन्समुळे केवळ रिप्रॉडक्शनवरच परिणाम होत नाही तर याने युटीआयचा धोका निर्माण होतो. त्यामुळे महिलांसह पुरुषांनीही टाइट जीन्स घालणे टाळावे. सर्वात महत्वाचे म्हणजे पुरुषांमध्ये कॅन्सरचा धोका निर्माण होतो आणि त्यांच्या प्रायव्हेट पार्टलाही नुकसान होऊ शकते.

टाइट जीन्समुळे पोटही दुखते. टाइट जीन्स कंबरेवर घट्ट असते ज्याने जिथे जिथे तुम्ही बसता तिथे तुमचे मांस ओढले जाते आणि शिरा दाबल्या जातात. परिणामी, तुमचे पोट दुखते. जर तुम्हाला वारंवार पोटदुखीचा त्रास जाणवत असेल तर एकदा तुमची जीन्स योग्य फिटिंगची आहे का नाही ते तपासून घ्या.

जेव्हा तुम्ही टाइट फिटिंगची जीन्स घालता तेव्हा तुम्हाला अजीर्णही होऊ शकते. टाइट फिटिंग जीन्समध्ये कम्फर्टेबल वाटू शकत नाही कारण अशा जीन्समुळे श्वास घेण्यास त्रास होतो. जेव्हा तुम्ही अशी टाइट जीन्स घालून जेवता तेव्हा तुम्हाला अजीर्ण होण्याची अधिक शक्यता असते.

काही लोकांना कंबरदुखी फार प्रकर्षाने जाणवते. यामागे तुमची टाइट फिटिंग जीन्स असू शकते कारण टाइट जीन्स हिप जाएंट आणि मणक्यावर परिणाम करते. ज्याने तुम्हाला उठण्यास आणि बसण्यास त्रास होतो. त्यामुळे जीन्सची निवड करताना अति टाइट साईझची निवडणे टाळावे.

 

 

 

 


हेही पहा :  उन्हाळ्यात पांढरे कपडे का वापरावेत

First Published on: April 11, 2024 6:00 PM
Exit mobile version