सौंदर्य खुलवणारे घरगुती पदार्थ वापरताना सावधान!

सौंदर्य खुलवणारे घरगुती पदार्थ वापरताना सावधान!

बेसन

उत्तम नैसर्गिक स्क्रब म्हणून बेसनचा वापर केला जातो. बेसनमुळे चेहरा स्वच्छ आणि उजळ होऊन चेहरा उजळतो. चेहऱ्यावरील मृत पेशी निघाव्यात यासाठी बेसन उपयुक्त ठरते. पण बेसनचा वापर करण्यापूर्वी आपल्या त्वचेची माहिती असणे गरजेचे आहे. जर तुमची त्वचा अधिक रुक्ष असेल आणि तुम्हाला मुरुमांचा त्रास असेल तर बेसनचा वापर टाळावा.

बेकींग सोडा

चेहऱ्यावरील ब्लॅक हेड रिमूव्ह करण्यासाठी बेकींग सोडा सर्सासपणे वापरतात. पण बेकींग सोड्यात पीएच मात्रा अधिक असतात. त्यामुळे संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी बेकींग सोडा वापरण्यापूर्वी विचार करावा. बेकींग सोड्याचा वापर केल्यास त्वचेची जळजळ, खाज, त्वचेवर लालसर चट्टे आदी त्वचेशी निगडीत त्रास होऊ शकतो. त्यामुळे बेकींग सोड्याचा अतिप्रमाणात वापर करणे टाळावे.

चुना

चेहऱ्यावरची मुरुमं चटकन घालवण्यासाठी चुना सर्रासपणे वापरला जातो. पण चुन्याचा वापर न करण्याचा सल्ला त्वचारोगतज्ज्ञ देतात. चुन्याचा वापर केल्यास लाल चट्टे, डाग येण्याची भीती आहे. तसेच हे डाग दीर्घकाळ राहू शकतात.

First Published on: September 15, 2019 6:00 AM
Exit mobile version