ब्यूटी पार्लरमधील शिष्टाचार

ब्यूटी पार्लरमधील शिष्टाचार

जेव्हा तुम्ही कुठल्याही ब्यूटीपार्लरमध्ये मेकअप करायला जाल तेव्हा शिष्टाचाराकडे विशेष लक्ष ठेवण्याची गरज असते. तुमच्या व्यवहाराने तिथल्या काम करणार्‍या आणि ग्राहकांना त्रास होणार नाही या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.

ब्यूटी पार्लरमध्ये दिलेल्या वेळेत तिथे जायला हवे. पार्लर बंद झाल्यावर जाऊ नये. ब्युटीशियनच्या घरी जाऊन तिला वारंवार त्रास देऊ नये. ज्या पार्लरमध्ये गर्दी असते तिथे जाण्याअगोदर वेळ घ्यावी आणि दिलेल्या वेळात जावे.

जर तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागली तर एकदम ओरडणे सुरू करू नये. शांतपणे तेथे बसून तेथे ठेवलेले मासिक किंवा पेपर वाचून वेळ काढू शकता. ग्राहक आणि ब्युटिशियन्सच्या कामात अडथळा आणू नये.

जर पार्लरमध्ये जास्त वेळ लागत असेल तर विनाकारण फिरून इकडे तिकडे पाहणे टाळावे. तेथे ठेवलेले सामान किंवा सौंदर्य प्रसाधने उचलून पाहू नये. जर एखाद्या प्रसाधनाबद्दल काही माहिती हवी असेल तर तेथे काम करणार्‍या ब्युटिशियन्सकडून त्याची माहिती घ्यावी.

जर तुम्हाला तुमच्या ब्युटिशियनचे काम पसंत पडले तर निघताना तिची तारीफ जरूर करा. त्यामुळे तिच्या मनोबलात वाढ होईल आणि भविष्यात ती तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे सेवा देईल.

First Published on: October 2, 2018 12:21 AM
Exit mobile version