आई व्हायचंय मग ‘या’ 4 गोष्टींवर द्या लक्ष

आई व्हायचंय मग ‘या’ 4 गोष्टींवर द्या लक्ष

इनफर्टिलिटी म्हणजेच वंधत्वाच्या समस्येमुळे तुम्हाला फॅमिली प्लॅनिंगमध्ये समस्या येऊ शकते. अशातच तुम्ही मानसिक ताणाचे शिकार होता. या समस्येवर काही घरगुती उपाय करु शकता. असे अशा कारणास्तव होते कारण शरिरात पोषक तत्वांची कमतरता. त्याचसोबत काही हार्मोनल बदलांवामुळे सुद्धा असे होते. यासाठी तुम्ही आपल्या डाएटमध्ये घरगुती गोष्टींची समावेश करुन यापासून दूर राहू शकता.

तज्ञांचे यावर असे म्हणणे आहे की, सध्याची बदललेली लाइफस्टाइल आणि असंतुलित आहारामुळे ही समस्या उद्भवते. यामुळे शुक्राणूंची गुणवत्वा आणि डेंसिटी कमी होत आहे. याच्या उत्तम उपचारासाठी हेल्दी डाएटसोबत काही घरगुती गोष्टींचे सेवन करावे. ज्यामुळे या समस्येचे निवारण केले जाऊ शकते. तज्ञांच्या मते २५-३० टक्के लोकांमध्ये ही समस्या दिसून येत आहे.

उत्तम सेक्स आणि प्रजनन आरोग्यासाठी पुढील घरगुती उपाय करु शकता
-आयुर्वेदिक चुर्णाचे सेवन


वंधत्वाच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही अश्वगंधा, शतावरी, सफेद मुसळी, कौंचचे बीज 100-100 ग्रॅम घेऊन ते एकत्रित करा. त्यानंतर याचे चुर्ण तयार करा. हे चुर्ण सकाळ-संध्याकाळ एक चमचा दूधासोबत प्या. यामुळे वंधत्वाच्या समस्येपासून तीन ते चार महिने आराम मिळेल.

-दालचिनी
 
दालचिनीचे सेवन करुन सुद्धा तुम्ही वंधत्वाच्या समस्येपासून दूर राहू शकता. दालचिनी हार्मोनल समस्येपासून दूर ठेवण्यास मदत करते. याच्या सेवनामुळे कंसिव करण्यास ही मदत होते. दालचिनी पावडर ही गरम पाण्यातून प्या. तसेच यामध्ये मध ही मिक्स करुन तुम्ही खाऊ शकता.

-तिळाचे तेल


तिळाच्या तेलाचे आरोग्याला काही लाभदायक फायदे होतात. वंधत्वाची समस्या दूर करण्यासाठी याचा सुद्धा वापर करु शकता. खरंतर तिळाच्या तेलाने पोटावर मालिश केल्यास ऑक्सिजनचा प्रवाह उत्तम होते. याचा वापर फर्टिलिटी वाढवण्यास ही केला जाऊ शकतो. तिळाचे तेल खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा वापरु शकता.

-भोपळ्याच्या बिया


भोपळ्याची भाजी सर्वजण खातात. परंतु त्याच्या बिया सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. याच्या सेवनाने सेक्स संबंधित समस्या दूर होतात. तसेच फर्टिलिटी सुद्धा वाढते. यामध्ये विटामिन आणि मिनिरल्सचे प्रमाण अधिक असते.

(टीप: वरील माहितीची मानिनी कोणतीही पुष्टी करत नाही. त्यामुळे जर तुम्ही प्रेग्नेंसीचा प्लॅन करत असाल तर आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला  जरुर घ्या.) 


हेही वाचा- वेळेवर Periods येत नसतील तर काय करावे?

First Published on: May 12, 2023 12:56 PM
Exit mobile version