पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ‘हा’ उपाय नक्की करून पाहा

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ‘हा’ उपाय नक्की करून पाहा

भारतात फुल फॅट दूध, दही, तूपचे खाद्यपदार्थ खाणे प्रत्येकालाच आवडते. त्याचसोबत जंक फूडच्या अधिक सेवनाने वजन वाढण्यासह लठ्ठपणाची समस्या उद्भवते. अशातच पोटावर चरबी अधिक वाढली जाते ज्याला आपण बेली फॅट असे म्हणतो. व्यायाम आणि डाएट बेली फॅट कमी करण्यासाठीचा बेस्ट पर्याय आहेच. पण काहीवेळेस धावपळीचे आयुष्य किंवा पुरेसा वेळ मिळत नसल्याने वजन कमी करण्यासाठी व्यायाम होत नाही. अशातच तुम्ही एक खास वेट लॉस ड्रिंक पिऊन सु्द्धा पोटावरील चरबी दूर करु शकता. हे ड्रिंक धण्यांपासून तयार केले जाते. याचा परिणाम ही लवकर दिसतो आणि तुमचे वजन ही कमी होते.(Belly fat reduce tips)

धण्यांमध्ये असे काही कंपाउंड असतात जे लिपिड मेटाबॉलिज्मला कमी करते. याच कारणास्तव खाल्ल्यानंतर त्यामधून फॅट, कोलेस्ट्रॉल, ट्राइग्लिसराइड ब्रेक होण्याशिवाय मल बाहेर पडतो. असे झाल्यास पोटावरची चरबी वाढू लागते.

धण्याचा दुसरा फायदा असा की, यामुळे मेटाबॉलिज्म वेगाने वाढते. यामुळे शरिरातील फॅट वेगाने एनर्जी निर्माण करुन घेतो. अधिक फॅट बर्न झाल्यानंतर आपोआपच वजन कमी होऊ लागते.

धण्याचे ड्रिंक बनवण्यासाठी काय कराल?
-1 चमचा धणे धुवून घ्या
-आता ते एका ग्लासात भिजवा
-हा ग्लास बंद करुन रात्रभर तसाच ठेवा

अशा या वेट लॉस ड्रिंकचे सेवन दररोज सकाळी केल्याने अधिक फायदे होतात. कारण त्यावेळी पोट रिकामे असते आणि शरिराला उर्जा मिळण्याचा कोणताही सोर्स नसतो. याच कारणास्तव शरिरातील फॅट बर्न होते. (Belly fat reduce tips)

उन्हाळ्यात या ड्रिंकचा फायदा दुप्पट होतो. वेट लॉस होण्यासह शरिर हाइड्रेट राहण्यास ही मदत होते. यामुळे तु्म्ही डिहाड्रेशन, हिट एग्जॉशन, हिट स्ट्रोकपासून बचाव होतो.


हेही वाचा- लग्नानंतर महिलांचे वजन वाढण्यामागील ‘ही’ आहेत कारणं

First Published on: June 4, 2023 3:41 PM
Exit mobile version