त्वचेसाठी कोरफड जेल असे ठरते फायदेशीर

त्वचेसाठी कोरफड जेल असे ठरते फायदेशीर

त्वचेसाठी कोरफड जेल असे ठरते फायदेशीर

बऱ्याच तरुणींना आपला चेहरा सुंदर आणि आकर्षित दिसावा, असे वाटत असते. याकरता महिला वर्ग पार्लमध्ये जाऊन प्रचंड पैसे देखील खर्च करतात. मात्र, यामुळे चेहऱ्याला देखील हानी होते. परंतु, तुम्ही काही घरगुती उपाय केल्यास तुमचा चेहरा सुंदर आणि आकर्षित दिसण्यास मदत होते. याकरता तुम्ही कोरफड जेलचा वापर करु शकता.

डाग-पिंपलसाठी गुणकारी

चेहऱ्यावर डाग, पटकुळ्या आल्या असल्यास याकरता कोरफडच्या जेलचा वापर करावा. याकरता दररोज कोरफड जेल २० मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि मग पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे डाग-पिंपल्स दूर होण्यास मदत होईल.

त्वचा होते टवटवीत

कोरफडमध्ये बीटा कॅरोटी आणि व्हिटामिन ए सारखे अॅन्टीऑक्सिडेंट्स असतात. जे नैसर्गिक ताजेपणा जपतात. त्यामुळे त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी दररोज कोरफड लावणे गरजेचे आहे.

मेकअप रिमूव्हर

मेकअप रिमूव्हरकरता कोरफड जेलचा चांगला फायदा होतो. याकरता कोरफड मेकअप केलेल्या चेहऱ्यावर लावून मग कापसाने चेहरा क्लिन करा.

सनबर्नकरता फायदा

कोरफडमध्ये अँटीऑक्सिडन्ट असते जे उष्णेतेपासून त्वचेचे रक्षण करते. याकरता कोरफड जेलला फ्रिजमध्ये थंड करुन सनबर्न स्कीनवर लावा, यामुळे थंडावा मिळण्यास मदत होते.

First Published on: October 2, 2020 6:58 AM
Exit mobile version