Friday, May 3, 2024
घरमानिनीBadishep Benefits : बडीशेप खाण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

Badishep Benefits : बडीशेप खाण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

Subscribe

आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवण झाल्यावर हमखास बडीशेप खायची सवय असते. अनेकांकडे बडीशेपचा वापर मसाल्याचा पदार्थ म्हणूनही केला जातो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, बडीशेप (Fennel Seeds In Marathi) किंवा सौंफमध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे तुमच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरतात. उन्हाळ्यात बडीशेपचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. बडीशेपचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि पोटाची उष्णताही शांत होते. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत बडीशेप खाण्याचे फायदे

तोंडातील दुर्गंधीपासून सुटका मिळते

ज्या व्यक्ती तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्रस्त असतात, त्यांच्यासाठी या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बडीशेपचा काढा मदत करू शकतो. बडीशेप उत्तम माऊथ फ्रेशनर मानली जाते.

- Advertisement -

हृदयरोग्यांसाठी फायदेशीर

बडीशेप खाल्ल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतो त्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळून हे शरीरातील फोलेटचे प्रमाण कमी करते आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करते. याशिवाय व्हिटॅमिन सी या आत असते, जे फ्री रॅडिकल क्रियांना प्रतिबंधित करते आणि हृदय निरोगी करते.

वेदना कमी करते

काही स्त्रिया मासिक पाळीच्या वेळेस होणाऱ्या वेदनांमुळे त्यांच्या चुकीच्या-अन्नामुळे आणि तणावामुळे अधिक त्रासतात. आपण देखील यापैकी एक महिला असल्यास बडीशेप बियामध्ये विशिष्ट गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्त प्रवाह वाढू शकतो. तसेच, त्यामध्ये आढळणारे फायटोस्ट्रोजन स्तन सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात.

- Advertisement -

अपचनाची समस्या

अपचनासारख्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बडीशेप फायदेशीर मानली जाते. यासाठी बडीशेपचा काढाही फायदेशीर ठरेल. गॅस, ऍसिडिटी अशा त्रासांपासून लांब राहण्यासाठीही बडीशेप फायदेशीर ठरते.

डोळ्यांसाठी फायदेशीर

बडीशेप आणि साखर खाल्ल्याने डोळे दीर्घकाळ निरोगी राहतात. यामुळे दृष्टी सुधारते. बडीशेप आणि साखर एकत्र खाल्ल्यास तुमची दृष्टी सुधारेल. यामुळे तुमचा चष्म्याचा नंबर कमी होण्यासही मदत होईल.

 खोकला आणि सर्दीपासून आराम

जर तुम्हाला खोकला आणि घसादुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही बडीशेप आणि साखर खावी. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून आराम देतात.

बडिशेप खाण्याचे तोटे 

बडीशेप खाण्याचे फायदे आणि तोटे (fennel seeds in marathi) आहेत. कारण कोणतीही गोष्ट अतीप्रमाणात सेवन केली तर त्याचे काही तोटेही सहन करावे लागू शकतात. त्याचप्रमाणे अती प्रमाणात बडिशेप खाल्यास हॉर्मोन्स असंतुलित होणे, त्वचेच्या समस्या, यकृताच्या समस्या जाणवू शकतात. विशेषतः गरोदर महिलांनी आणि लहान मुलांनी अती प्रमाणात बडिशेप खाऊ नये. याशिवाय बडीशेपच्या वापरामुळे चेहऱ्यावर पुरळ उठू शकते. अशा परिस्थितीत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार विशिष्ट जातीची बडीशेप खाल्ल्यास ते अधिक चांगले.

हेही पहा :

____________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -

Manini