Tuesday, May 7, 2024
घरमानिनीKitchen Tips : चिकट, काळपट कढई अशी करा स्वच्छ

Kitchen Tips : चिकट, काळपट कढई अशी करा स्वच्छ

Subscribe

स्वयंपाक केल्यानंतर भांडी स्वच्छ करणं हा महिलांसाठी खूप मोठा टास्क असतो. अशावेळी करपलेली, जळलेली जर एखादी कढई किंवा तवा असेल तर खूप मोठा ताण महिलांना होता. अशा करपलेल्या भांड्यांना कसं स्वच्छ करायचं हा प्रश्न अनेक गृहिणींनी पडतो. जर तुमची कढई, तवा खूप जास्त जळाला किंवा करपला असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता काही घरगुती उपाय करुन तुम्हाला काळपटपणा दूर करता येईल. काय आहेत हे उपाय जाणून घेऊयात.

कॉस्टिक सोडा

कढईला चमक देण्यासाठी तुम्ही कॉस्टिक सोडा देखील वापरू शकता. यासाठी गरम पाण्यात कॉस्टिक सोडा मिसळा. या पाण्यात कढई बुडवा. आता काही वेळाने घासा तव्याचा काळेपणा दूर होईल, पण यावेळी कढई साफ ​​करताना हातमोजे घालायला विसरू नका.

- Advertisement -

व्हिनेगर

व्हिनेगर नैसर्गिक क्लीन्सर म्हणून देखील कार्य करते, ते पॅनमधून गंज, वंगण आणि काळेपणा सहजपणे काढून टाकू शकते. यासाठी एक मोठे भांडे घ्या आणि त्यात पाणी उकळा, नंतर त्यात पांढरा व्हिनेगर आणि लिंबू मिसळा. आता त्यात कढई ठेवा. यामुळेही काळपटपणा दूर होईल.

डिटर्जंट आणि बेकिंग सोडा वापरा

सतत वापरून काळी झालेल्या कढईचा काळपटपणा आणि चिकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही डिटर्जंट पावडर आणि बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते तापवत ठेवा. या पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा आणि १ चमचा डिटर्जंट पावडर मिसळून पाणी तापू द्या. त्यानंतर या गरम पाण्यात कढई 15 ते 20  मिनिटांसाठी बुडवून ठेवा. कढई पाण्यातून काढून स्क्रबरच्या मदतीने स्क्रब करा. यामुळे देखील कढई अगदी स्वच्छ होण्यास मदत होईल.

- Advertisement -

हेही वाचा : Home Decor Tips- घरासाठी परफेक्ट पडदे कसे सिलेक्ट करायचे?

मीठ आणि लिंबू

कढई साफ ​​करण्यासाठी तुम्ही मीठ आणि लिंबाची मदत घेऊ शकता. यासाठी कढईत 3  ग्लास पाणी टाकून गॅसवर ठेवा. आता 2 चमचे डिटर्जंट, 1 चमचा मीठ आणि 1 लिंबाचा रस पाण्यात पिळून घ्या. यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा आणि पाण्याला 5 मिनिटे उकळू द्या. यामुळे पॅनमधील काळेपणा लगेच दूर होईल.

लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा

काळी आणि चिकट झालेली लोखंडी कढई स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी कढईत पाणी भरून गॅसवर तापत ठेवा. पाण्यामध्ये 1/2 चमचे लिंबाचा रस आणि 1 चमचा बेकिंग सोडा टाकून मिसळा. २-३ मिनिटांसाठी पाणी उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. पाणी फेकून लिक्विड डिटर्जंट आणि स्क्रबरच्या मदतीने कढई घासा यामुळे कढई पुन्हा एकदा चमकू लागेल.

अशा प्रकारे घरातीलच वस्तू किंवा अगदी स्वस्त गोष्टी वापरून तुम्ही काळी आणि चिकट झालेली लोखंडाची कढई अगदी सहज स्वच्छ करू शकता. शिवाय लोखंडाची कढई वापरत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं.
  • लोखंडाच्या कढईत पदार्थ शिजवल्यानंतर ते लगेचच दुसऱ्या भांड्यात काढावेत.
  • पदार्थ काढल्यानंतर कढई लगेचच डिटर्जंटने घासून स्वच्छ धुवून ठेवावी.
  • कढई धुतल्यानंतर ती पूर्ण कोरडी करून ठेवावी.
  • कढईचा लगेच वापर होणार नसेल तर कढई कोरडी करून तिला थोडं तेल लावून ठेवावं.
  • यामुळे कढईला गंज पकडत नाही.

हेही वाचा : Women Handbag : नवी कोरी बॅग पेपरनी का भरलेली असते?

___________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -

Manini