Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealth Care : मध खाण्याचे फायदे आणि तोटे, जाणून घ्या

Health Care : मध खाण्याचे फायदे आणि तोटे, जाणून घ्या

Subscribe

मध हा असा पदार्थ असतो जो प्रत्येकाच्या घरात आपल्याला दिसून येतो. मधाचे अनेक फायदे आहेत. अगदी सौंदर्यापासून ते आरोग्यापर्यंत अनेक फायदे आपल्याला मधापासून मिळत असतात. मध हा खरं तर प्रत्येकाच्याच आवडीचा पदार्थ आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मधाचा आपल्या आरोग्यासाठी बराच फायदा होत असतो. मध हा अँटीऑक्सीडेंट आणि अँटीसेप्टिक गुणांनी उपयुक्त असतो. आयुर्वेदात त्याचा औषध म्हणूनही वापर केला जातो. पण गरजेपेक्षा जास्त मधाचे सेवन करणे हे आपल्या तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे मधाचे फायदे आणि तोटे काय आहेत हे जाणून घेऊयात.

मधाचे फायदे :

रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ

मधामध्ये अँटिबायोटिक आणि अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ करून आरोग्यास मदत करतात. त्यामुळे शरीर कोणत्या संक्रमणाशी सहजरीत्या लढू शकते.

- Advertisement -

पचनासंबंधित समस्यांवर फायदेशीर

मधामध्ये प्री-बायोटिक गुणधर्म असू शकतात, जे आतड्यांतील चांगल्या जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देतात. त्यामुळे पचनासंबंधित समस्यांवर मध फायदेशीर ठरतो.

खोकल्यापासून आराम

कफ सिरपमध्ये मध हा एक सामान्य घटक आहे. कारण- सर्दी, खोकला आणि घशासंबंधित आजार बरे करण्याच्या दृष्टीने मधातील गुणधर्म उपकारक ठरत असल्याने मध हा त्याबाबत एक रामबाण उपाय आहे.

- Advertisement -

त्वचा निरोगी राहते

मधामुळे त्वचा निरोगी राहण्यासही मदत होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन करू शकता. मध आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्याचे कार्य करतो. यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसते. तसेच तुमचा रंगही उजळतो.

हेही वाचा : Side Effects Of Drinking Raw Milk:कच्चे दूध पिण्याचे दुष्परिणाम

मधाचे तोटे :

मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक

मधामध्ये साखर व कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. जर तुम्हू गरजेपेक्षा जास्त मध खाल्लात तर त्यामुळे ब्लड शउगर वाढू शकते. त्यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांनी एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त मध करू नये.

पोटाच्या समस्या

जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रासला असाल तर आहारात मधाचा कमी प्रमाणात समावेश करावा. मधाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने डायरिया सारख्या पाचन समस्या उद्भवू शकतात.

दात किडू शकतात

मधामध्ये नैसर्गिक साखर असते, पण त्याचे प्रमाणही अधिक असते. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त मध खाल्लात, तर तुम्हाला दातांसंदर्भातील काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याच्या अतिरिक्त सेवनामुळे दात किडू शकतात.

मधामध्ये साखर देखील असते आणि त्याच्या सेवनाने तुमचे वजनही वाढू शकते. त्यामुळे याचे सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका. तज्ञांच्या मते, निरोगी व्यक्ती दररोज 2-4 चमचे मधाचे सेवन करू शकते, परंतु हे प्रमाण शरीराच्या प्रकारानुसार देखील बदलू शकते.

हेही वाचा : Watermelon Vs Melon : उन्हाळ्यात काय खावं कलिंगड की खरबूज?

___________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -

Manini