जमिनीवर बसून करा जेवण

जमिनीवर बसून करा जेवण

lunch

जमिनीवर बसून जेवण करण्याचे फायदे 

डायनींग टेबलवर बसून जेवण करणे आरामदायी, सोयीस्कर असले तरी त्यामुळे शारीरिक व्याधी जडण्याची शक्यता अधिक आहे. तर जमिनीवर बसून जेवण केल्याने अनेक लहान सहान आजार आपल्यापासून दूर राहतात. कारण की, जमिनीवर मांडी घालून आपण जेवायला बसतो, तेव्हा आपण एका विशिष्ट योगासन घालून बसलेलो असतो. या आसनाला सुखासन म्हणतात. सुखासन पद्मासनाचे एक रूप आहे. पद्मासनामुळे जे फायदे होतात ते सर्व फायदे सुखासनामुळे होतात.

* बसून जेवणाचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे बसल्याने पाठ, कंबर आणि पोटाजवळील स्नायूंवर ताण येऊन पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. त्यामुळे अन्नपचनास सुलभता येते. शिवाय, शरीर लवचिक बनण्यासही मदत होते.

* जमिनीवर बसून जेवल्यास अर्धपद्मासनाची स्थितीत आपण असतो. त्यात ताट जमिनीवर असल्याने आपल्याला घास घेण्यासाठी वाकावं लागतं. त्यामुळे सतत होणारी शारीरिक हालचाल पोटाजवळील स्नायूंना चालना देते. पर्यायाने पचनक्रीया सुधारते.

* अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला अधिक उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो.सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, घरातल्या सर्वांसोबत जमिनीवर बसून जेवल्यास दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास मदत होते व नकळत कुटूंबातील सर्वांशी जवळीक वाढते.

* जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते.

First Published on: March 10, 2019 5:05 AM
Exit mobile version