‘ब्रेड पोहा’ रेसिपी

‘ब्रेड पोहा’ रेसिपी

ब्रेड पोहा

दररोजच्या धावपळीत सकाळचा नाश्ता काय करावा हा सर्वच गृहिणींना प्रश्न सतावत असतो. त्यात दररोजचे कांदे पोहे, गोडाचा शिरा आणि उपमा हे देखील खाऊन सतत कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा होते. अशावेळी ‘ब्रेड पोहा‘ ही झटपट होणारी रेसिपी नक्की ट्राय करुन पहा.

साहित्य :

२ टेबल स्पून तेल
१/८ टी स्पून हींग
५ – ६ कढ़ीपत्ता
२ लाल मिर्च्या
१ कप मटर
१/२ कप शेंगदाणा
१ टी स्पून हळद
१ टी स्पून मीठ
४ ब्रेडचे स्लाइस
२ हिरव्या मिर्च्या
१ टेबल स्पून लिंबू रस
१ कप कोथिंबीर
खोबर

कृती :

सर्वप्रथम एका पातेल्यात एक चमचा तेल घालून त्यात लाल मिरची, हिंग, कढीपत्ता घालून ते गरम करुन घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये मटार घालून शिजवून घ्यावे. त्यात शेंगदाणे, हळद, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची आणि लिंबू रस टाकून एकजीव करुन घ्यावे. हे सर्व सारण शिजल्यानंतर त्यामध्ये ब्रेडचे बारीक तुकडे घालून एकत्र करुन घ्यावे. अशाप्रकारे तुमचे खमंग ब्रेड पोहा खाण्यासाठी तयार.

First Published on: July 6, 2019 6:15 AM
Exit mobile version