लक्षात राहत नाही, विसरायला होतंय?

लक्षात राहत नाही, विसरायला होतंय?

वयोमानानुसार जसे आजारपण डोके वर काढू लागतात, तसेच वयाचा परिणाम मेंदूवरही दिसायला लागतो. त्यामुळे हल्ली बऱ्याच जणांना विसरभोळेपणाचा त्रास जाणवत आहे. असे लोक सतत काही ना काही विसरतात, त्यामुळे त्याच्या रोजच्या रुटीनमध्येही अडथळे निर्माण होतात. साधरणतः वयोवृद्धांमध्ये विसरभोळेपणाचा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो. मात्र, हल्ली धावपळीच्या रुटीनमुळे कमी वयातही तरुणांना विसरभोळेपणा जाणवत आहे.

आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास कमी वयात जास्त प्रमाणात विसरभोळेपणा चांगला नाही. याचा हळूहळू तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. यासह तुम्ही सतत जर गोष्टी विसरत असाल तर तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचा फायदा घेण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टी तुमच्यासोबत होऊ नये यासाठी तुमची स्मरणशक्ती शार्प असायला हवी. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तज्ज्ञांनी दिलेल्या काई सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही विसरभोळेपणावर मात करू शकाल.

नवीन स्किल्स शिका – तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मेंदू निरोगी आणि ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी नवनवीन ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायला हवा. तुम्हाला जर वेळ मिळत नसेल तर तुम्ही महिन्यातून एकदा तरी एखादी ॲक्टिव्हिटी करायला हवी. अशाने मेंदू त्याचे काम नियमितपणे करू लागतो आणि कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत नाही. तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टी विसरत असाल तर ही ट्रिक नक्की ट्राय करून पहा.

रुटीन फॉलो करा – सकाळी उठण्याची आणि रात्री झोपण्याची वेळ निश्चित करून ती फॉलो सुद्धा करा. यात तुमच्या जेवणाच्या वेळा सुद्धा फिक्स असायला हव्यात. याने मेंदू एकाच दिशेने ट्रेन होतो आणि याने गोष्टी लक्षात राहण्यास मदत होते.

ऑर्गनाईझ राहा – तुम्हाला जर वस्तू इकडे-तिकडे टाकण्याची सवय असेल तर ती आजचा सोडा. वस्तू जागच्या जागी ठेवण्याची सवय लावा. याने वेळेत वस्तू सापडतील आणि तुमची गैरसोय होणार नाही.

पूर्ण झोप घ्या – तंज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने 7 ते 9 तास घेणे आवश्यक असते. अपूर्ण झोपेचा आपल्या संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम होत असतो. यासाठी प्रत्येक व्यक्तीने झोप पूर्ण करण्याचा प्रयन्त करावा.

सराव करा – एखाद्या व्यक्तींचे नाव किंवा तुम्ही काही नवीन शिकल्यास त्याचा सराव करा. अशाने ती गोष्ट लक्षात राहण्यास मदत होईल. याशिवाय मेमरी स्ट्रॉंग करण्यासाठी कॅलेंडर, फाईल किंवा रुटीन प्लॅनर तयार करा. दिवसभरात याकडे पाहिल्यास सर्व कामे सहज लक्षात राहतात.

सर्व इंद्रियांचा वापर करा – कोणतेही काम करण्यासाठी सर्व इंद्रियांचा वापर केल्यास त्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, मातीचे मडके बनविण्यासाठी हातांचा वापर होतो. म्हणजेच तुम्ही स्पर्श करता आणि मातीचा वासही घेता. याने मेंदू ऍक्टिव्ह होतो आणि गोष्टी लक्षात राहण्यास मदत होते.

 

 

 


हेही पहा : Mantra : बीपी,डायबेटिससाठी करा मंत्र जप

First Published on: April 11, 2024 8:00 PM
Exit mobile version