सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय

सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय

जायपत्रीच्या सेवनाने सर्दी आणि खोकल्यापासून बचाव होतो.

सध्या थंडी असल्यामुळे हवामानात देखील बदल होत आहे. त्यामुळे सातत्याने सर्दी सारखा आजार त्रास देत आहे, अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास तुमची सर्दी दूर होण्यास मदत होईल.

हळद

हळद ही सर्वच आजारांवर एक रामबाण उपाय आहे. विशेष म्हणजे सर्दी – खोकल्यावर हळद ही फायदेशीर ठरते. त्यामुळे जर तुमचे नाक वाहत असेल तर, हळकुंड जाळून त्याचा धूर घ्यावा, याने नाकातून पाणी येईल आणि आराम मिळण्यास मदत होईल.

वेलची

नाक बंद झाले असेल, तर कलमी, काळेमिरे, वेलची आणि जिरे समप्रमाणात घेऊन एका सुती कापडात बांधून त्याचा वास घ्यावा, लगेचच शिंका येतील आणि आराम मिळेल.

अडुळशाचा काढा

काही वेळा नाकात धूर – धूर जाणे, जागरण होणे यामुळे सर्दी होते. ही सर्दी जाण्यासाठी अडुळशाचा काढा घ्यावा. गवती चहाचा काढाही साखर घालून घेतल्यास त्याचा चांगला फायदा होतो.

ओव्याची धुरी

काहीवेळा ओव्याची धुरी घेतल्याने सर्दी कमी होऊ शकते. ओवा परतून त्याची पुरचुंडी रुमालात बांधून ती हुंगली तर सर्दी बाहेर पडते आणि डोके देखील हलके होते.

तुळशीची पाने

तुळशीची पाने दोन कप पाण्यात उकळून घ्यावीत. पाणी अरेधे होईपर्यंत उकळून घ्यावे. रोज सकाळी हे पाणी गाळून प्यायल्यास सर्दी होत नाही.

First Published on: January 17, 2020 2:53 PM
Exit mobile version