Corona Vaccine: लसीचा एक डोस कोरोना संक्रमणापासून बचाव करू शकतो?

Corona Vaccine: लसीचा एक डोस कोरोना संक्रमणापासून बचाव करू शकतो?

काय सांगता? ...अन् 'Corona Vaccine' घेताच 5 वर्षांपूर्वी आवाज गमावलेल्या व्यक्तीची बोलायला सुरुवात

प्रत्येकाला असा प्रश्न नक्की पडला असेल की, लसीचा एक डोस कोरोना संक्रमणापासून बचाव करू शकतो? तर याचे उत्तर हो आहे. लसीचा एक डोस कोरोना व्हायरसविरोधात सुरक्षा करेल. परंतु जेवढे दोन डोस घेतल्यानंतर सुरक्षित व्हाल तेवढे नाही. तज्ज्ञांनुसार, लोकांनी दोन डोस घेतले पाहिजे. सध्या कोरोना व्हायरसचा म्युटेंट डेल्टा व्हेरियंट सर्वत्र पसरला आहे. पहिल्यांदा भारतामध्ये आढळलेल्या हा व्हेरियंट आता काही देशांमध्ये कहर करत आहे. अशा परिस्थिती कोरोना लसीचे दोन डोस घेणे खूप आवश्यक आहे.

जागतिक स्तरावर कोरोना लस २०१९च्या अखेरस आढळलेल्या व्हायरसच्या संक्रमणावर लक्ष्य केंद्रीत करून तयार केली होती. परंतु सध्या या लसी नव्या व्हेरियंट विरोधात काम करत आहेत, परंतु जर व्हायरसचे अशाच प्रकारे रुप बदलत राहिले तर लसीच्या डोसचा त्यावर प्रभाव होणार नाही.

डेल्टा व्हेरियंटवर ब्रिटिश संशोधकांनी एक अभ्यास केला आहे. त्यामध्ये असे आढळले की, ज्या लोकांना एस्ट्राजेनेका आणि फायझर बायोएनटेकच्या लसीचे दोन डोस मिळाले आहेत, ते लोकं पूर्णपणे कोरोनापासून सुरक्षित आहेत. तर एका डोसमुळे सुरक्षा कमी होत आहे. ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरियंटचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी अलीकडेच पूर्णपणे लॉकडाऊन हटवला नाही आहे. जेणेकरून लोकांना दोन डोस लावले जातील.

जेथे दोन डोसच्या अंतरानंतर दुसरा डोस उपलब्ध नाही आहे, त्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयसेस म्हणाले की, ‘कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला रोखण्यासाठी लसीचा एक डोस पुरेसा नाही आहे. जोपर्यंत सर्व लोकांना दोन्ही डोस दिले जात नाहीत, तोपर्यंत लोकांनी सोशल डिस्टिन्सिंगचे पालन केले पाहिजे.’

तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाले की, ‘लसीचा दुसरा डोस खूप महत्त्वाचा आहे. कारण यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.’


हेही वाचा – WHO वैज्ञानिकांचा Delta Plus Variantबाबत मोठा खुलासा


First Published on: July 2, 2021 4:13 PM
Exit mobile version