घरताज्या घडामोडीWHO वैज्ञानिकांचा Delta Plus Variantबाबत मोठा खुलासा

WHO वैज्ञानिकांचा Delta Plus Variantबाबत मोठा खुलासा

Subscribe

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा (Delta Plus Variant) प्रसार वाढत असल्यामुळे जगातील चिंता वाढली आहे. पण यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनी डेल्टा प्लस व्हेरियंट संदर्भात एक खुलासा केला आहे. सद्यस्थितीला डेल्टा प्लस जागतिक आरोग्य संघटनेसाठी चिंतेचा (Variant of concern) विषय नाही आहे, असे मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी गुरुवारी एक हिंदी वृत्तवाहिनीला सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, ‘सध्या व्हायरसच्या या व्हेरियंटमुळे संक्रमण होण्याची संख्या कमी आहे.’

डॉक्टर स्वामीनाथन पुढे म्हणाल्या की, ‘काही देशांकडे कोविशिल्डला पासपोर्ट कार्यक्रमात मान्यता न देण्यामागे कोणाताही तर्क नव्हता. युरोपात एक्स्ट्राजेनेका लस एक वेगळा ब्रँड अंतर्गत उपलब्ध आहे. पण सध्या डब्ल्यूएचओ कोविशिल्डला पासपोर्टमध्ये सामिल करण्यासाठी युरोपीय वैज्ञानिक नियामकसोबत बातचित करत आहे.’

- Advertisement -

पुढच्या महिन्यात कोव्हॅक्सिनला WHOची मिळू शकते मंजुरी

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने अजूनही भारतीय कोव्हॅक्सिनला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली नाही आहे. याबाबत डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या की, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कोव्हॅक्सिनला मंजुरी देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंटपासून सुरक्षित राहायचे असेल तर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, ‘आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरियंट हा अधिक संसर्गजन्य, अधिक मृत्यूचे आणि प्रतिशक्ती कमी करण्याचे कारण असल्याचा डेटा नाही आहे. परंतु जर आपण कोरोना नियमांचे पालन केले तर आपण कोणत्याही व्हेरियंटपासून सुरक्षित राहू.’

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccine: कोरोना लसीचे दोन डोस डेल्टा व्हेरियंटपासून बचाव करू शकतात – EMAचा दावा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -