Cozy cardio म्हणजे काय?

Cozy cardio म्हणजे काय?

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सध्या एक्सरसाइजचा नवा ट्रेंन्ड फॉलो केला जात आहे. तो म्हणजे कोजी कार्डिओ. याचे व्हिडिओ सध्या खुप व्हायरल होत आहेत. याच्या मदतीने तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. यासाठी हार्डकोर वर्कआउट करण्याची गरज नाही.

कोजी कार्डिओ म्हणजे काय?
कोजी कार्डिओ एक फिटनेस रुटीन आहे. त्यामध्ये अधिक धावपळ किंवा हाय इंटेसिटी वर्कआउट करण्याची काही गरज नसते. कोजी याचा अर्थ असा होतो की, आरामदायी. कोजी कार्डिओ अशी एक अॅक्टिव्हिटी आहे जी आपण आरामात करू शकते. ही करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा तणाव किंवा स्ट्रेस घेण्याची गरज नाही. याच्या माध्यमातून सुद्धा वजन कमी होऊ शकते.

सध्या आपण पाहतो की, बहुतांश लोक जिममध्ये जाऊन वर्कआउट करतात. पण अशाकाही घटना त्यावेळी घडल्या आहेत जेव्हा व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला आहे. अशातच कोजी कार्डिओ फायदेशीर आहे. डब्लूएचओने असे सांगितले आहे की, ही एक्सरसाइज दररोज केल्याने हृदयाचे आरोग्य, स्ट्रोक, मधुमेह आणि कॅन्सर सारखे आजार दूर होण्यास मदत होते. त्याचसोबत लाइफस्टाइलमध्ये सुधारणा होते.

First Published on: September 15, 2023 3:49 PM
Exit mobile version