एकच Tooth Brush किती वेळ वापरला पाहिजे? वाचा तज्ञ काय म्हणतात

एकच Tooth Brush किती वेळ वापरला पाहिजे? वाचा तज्ञ काय म्हणतात

आपल्या गोड स्माइवेळी आपले दात अधिक चमकतात. हेच कारण आहे की, स्वच्छ, सफेद दातांसाठी काही लोक विविध उपाय करतात. लोक दातांच्या स्वच्छतेसाठी काही बाजारात उपलब्ध असलेल्या विविध टुथपेस्टचा वापर करतात. दातांच्या आरोग्याची ही काळजी घेतली जाते. पण यावेळी आपण एक चुक करतो ती म्हणजे ब्रश. एकदा ब्रश खरेदी केल्यानंतर तो बहुतांशजण दीर्घकाळ वापरतात. अशातच तुम्ही सुद्धा असेच करत असाल तर सावध व्हा. दीर्घकाळ एकच टुथब्रश वापरल्यामुळे तुम्हाला काही प्रकाचे डेंटल आणि ओरल प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की, तुम्ही तुमचा ब्रश किती वेळानंतर बदलला पाहिजे. यावरच तज्ञ काय म्हणतात हे जाणून घेऊयात. (Dental care tips)

तज्ञ असे म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीने हेल्दी दातांसाठी आपला ब्रश हा 3-4 महिन्यांनी बदलला पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही ब्रश तुटेल, त्याचे ब्रेसल खराब होण्यासाठी चार महिन्यांची वाट पाहिली पाहिजे. जर तुमचा ब्रश वेळेआधीच खराब होत असेल तर तो लगेचच बदलावा. तज्ञ असे ही सांगतात की, ज्या लोकांच्या घरामध्ये एखाद्याला डेंटल समस्या किंवा हेल्थ हाइजीन संबंधित समस्या अशेल तर अशा लोकांनी 1-2 महिन्यातच आपला टुथब्रश बदलला पाहिजे.

दीर्घकाळ एकच ब्रश वापरण्याचे दुष्परिणाम
डेंटल तज्ञ असे म्हणतात की, जर तुम्ही दीर्घकाळ एकच टुथब्रशचा वापर करत असाल तर ते आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. काही महिन्यांपर्यंत टुथब्रशचा वापर केल्याने बॅक्टेरिया तोंडात जमा होतात. यामुळे दात दुखणे, कॅविटी आणि प्लाक जमा होण्याची समस्या होऊ शकते. या व्यतिरिक्त दीर्घकाळ टुथब्रशचा वापर केल्याने अन्य काही समस्या सुद्धा उद्भवू शकतात. (Dental care tips)

3-4 महिन्यापेक्षा अधिक वेळा टुथब्रशचा वापर केल्याने ब्रेसल्सवर फंगस जमा होते. यामुळे तोंडाचे संक्रमण होऊ शकते आणि यामुळे तोंड येणे किंवा जीभेवर दाणे येण्याचे कारण ठरु शकते. दीर्घकाळापासून एकाच टुथब्रशचा वापर केल्याने दातांमध्ये कॅविटीची समस्या होऊ शकते.


हेही वाचा- Oral Health Of Kids : लहान मुलांच्या ओरल हेल्थसाठी वापरा ‘या’ टिप्स

First Published on: June 2, 2023 1:02 PM
Exit mobile version