सोशल मिडिया एडिक्शनने लहान मुलांमध्ये वाढतेय डिप्रेशन

सोशल मिडिया एडिक्शनने लहान मुलांमध्ये वाढतेय डिप्रेशन

सोशल मिडिया एडिक्शनने लहान मुलांमध्ये वाढतेय डिप्रेशन

अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण या माणसाच्या जीवनावश्यक बेसिक गरजा आहे हे मानलं जात असे. पण आता या जीवनावश्यक गरजे मध्ये मोबाईलचा आणि इंटरनेटचा देखील समावेश झाला आहे. याचा अतिरेक इतका वाढू लागला आहे की यामुळे अनेक मुलांना मानसिक,शारीरिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीच्या 90 च्या काळातील मुलांवर आई वडील ओरडत असे की जास्त वेळ टीव्हि पाहू नकोस पण आताच्या इंटरनेटच्या युगात टीव्हि आणि मोबाईल वापरचा अतिशय गंभीर परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत आहे.ऑक्सफोर्ड युनिवर्ससिटिने यूके आणि युएस मधील 4 लाख  मुलांवर संशोधन केले आहे आणि या संशोधनात त्यांना असे आढळून आले की, जे मूल तंत्रज्ञानाचा अतिवापर करतात त्यांच्यात मानसिक ताण जास्त प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे.तीन वेगवेगळ्या टप्प्यातील अभ्यास क्रमानुसार 4 लाख मुलांवर केलेल्या संशोधनामध्ये मानसिक आजार आणि तंत्रज्ञान यांच्यात काही दुवा आहे का हे शोधण्याचा प्रयत्न संशोधनकर्त्यांनी केला. त्यांचा परस्पर संबंध असून ते वेळोवेळी वाढतात असा निष्कर्ष समोर आला आहे. या डेटा सेट मधून संशोधनकर्त्यांना आढळून आले की वैद्यकीयदृष्ट्या संबंधित मानसिक आरोग्याचा परिणामामुळे नैराश्य येण्याची शक्यता आहे आणि याचा संबंध तंत्रज्ञानाचा नाकरत्मक परिणाम एखाद्या व्यक्तीवर होणे हे आहे. पण तंत्रज्ञाना बरोबरच सोशल मीडियाचा आणि टेलीविजन याचा सातत्याने वापर करणे म्हणजे मानसिक आजारास निमंत्रण देणे होय.

संशोधनाचे मुख्य डॉ. व्युरे( Dr Vuorre) यांच्या म्हणण्यानुसार तंत्रज्ञानाचा वापर आणि मानसिक आरोग्य समस्या यामध्ये कोणताही विशिष्ट असा दुवा नाही.तसेच हे देखील दर्शवित नाही की काळाबरोबर तंत्रज्ञान मानसिक आरोग्य हे जास्त हानिकारक होते. सोशल मीडियाचा वापर आणि भावनिक समस्यांमधील काही मर्यादीत सबंध असल्याचे आढळले आहे. याचे असंख्य असे घटक असू शकतात कदाचित काही समस्या, अडचणी असणारे मूलं आधार घेण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात. तंत्रज्ञानाचा वापर करणारे लोक जास्त काळ सोशल मीडियाचा जास्त वापर करतता कारण हेच माध्यम व्यक्तीच्या भावनिक आणि मानसिक स्थितीशी सर्वाधिक जवळीक साधू लागते. तंत्रज्ञानाने केलेली प्रगति पाहता लोकांच्या मानसिक आजारात सुद्धा जास्त भर पडत असल्याचे निष्कर्षात समोर आले आहे.


हे हि वाचा – CT Scan म्हणजे काय? कोरोना काळात सर्वाधिक वापर का केला जातोय?

First Published on: May 5, 2021 7:00 PM
Exit mobile version