डाएट सोडा शरीरासाठी घातक, डायबिटीस २ ला आमंत्रण

डाएट सोडा शरीरासाठी घातक, डायबिटीस २ ला आमंत्रण

डाएट सोडा शरीरासाठी घातक, डायबिटीस २ ला आमंत्रण

हल्ली धावपळीच्या जगात अनेक जण बाहेरचे फास्ट फूड खाणे अधिक पसंत करतात. या फास्टफूडबरोबरचं डाइट सोडा अनेक जण आवडीने पितात. मॅग्डी, पिझ्झा हटसारख्या ठिकाणी एखादा पदार्थ मागवला तर त्यासोबत डाइट सोडा म्हणजे कोल्ड ड्रिंग्स हे मागवले जातेच. परंतु, दररोज कोल्ड ड्रिंग्सचे सेवन करणे शरीरास अधिक अपायकारक ठरत आहे.
दररोज एक ते दोन कप कोल्डड्रिंग्स पिल्याने ह्रदय आणि किडणी संबंधित आजारांना निमंत्रण मिळत असते. त्याचप्रमाणे कोल्ड ड्रिंग्सच्या अतिसेवनामुळे किडनीच्या कार्यात बिघाड होत शारिरीक आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. किडनीतील पेशींमध्ये घातक फ्री-रॅडिकल्सचे प्रमाण वाढते. तरीही अनेक जण कोल्ड ड्रिंग्सने पचनसंस्था सुधारते, असे मानत जेवणानंतर मोठ्याप्रमाणात कोल्डड्रिंग्सचे सेवन करतात. यात वारपण्यात येणाऱ्या केमिकममुळे याचे अतिसेवन शरीरास फायदेशीर नसून अधिक नुकसानदायकच ठरत आहे. त्यामुळे आज आपण या कोल्ड ड्रिंग्सच्या सेवनाने काय नुकसान होऊ शकते? लठ्ठपणा आणि डायबिटीस २ ची समस्या कशी वाढते? याची माहिती जाणून घेणार आहोत.

काय असतो डाइट सोडा?

डाइट सोडा एकप्रकारे सॉफ्ट ड्रिंग्सचा प्रकार आहे. यात साखरेचे प्रमाण अधिक कमी असते आणि त्याची चव सोड्याप्रमाणे असते. आपल्या आरोग्याची काळजी घेणारेच लोक याचे अधिक सेवन करतात. तसेच या कोल्ड ड्रिंग्सचे उत्पादक कंपन्याही विक्री हा मुख्य हेतू ठेवत निर्मिती करत असल्याने यामध्ये जिरो कॅलरी आणि साखरेचे प्रमाण कमी असल्याच्या जाहिराती करतात.

डाइट सोड्याचे सेवन केल्याने होणारे नुकसान

जर तुम्ही डाइट सोडा अर्थात कोल्ड ड्रिंग्स जिरो कॅलरी आणि साखरेचे प्रमाण कमी आहे, असे समजून पित असाल तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण यात विविध प्रकारचे केमिकल आणि गोडवा येण्यासाठी आर्टीफिशियल रंगांचा वापर करतात. त्यामुळे कोल्ड ड्रिंग्सच्या लठ्ठपणा आणि डायबिटीस २ चा धोका अधिक वाढतो. एका संशोधनात असे समोर आले की कोल्ड ड्रिंग्सच्या सेवनाने गोड काहीतरी पिण्याची भूक अधिक वाढते. तर अनेक जण थोडेसे कोल्ड ड्रिंग्स पिल्याने शरीरावर काही परिणाम होत नाही असा विचार करतात.

लठ्ठपणा

कोल्ड ड्रिंग्समध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरी आणि केमिकलयुक्त गोडवा असल्याने लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. तसेच भूक वाढण्यास देखील कोल्ड ड्रिंग्स कारणीभूत ठरत आहे.

डायबिटीज २

कोल्ड ड्रिंग्सबद्दल असेही सांगितले जाते की कोल्ड ड्रिंग्स साखरयुक्त आणि केमिकलयुक्त असते. परंतु, एका संशोधनातून समोर आले की कोल्ड ड्रिंग्सच्या सेवनाने लठ्ठपणा आणि डायबिटीज २ चा धोका वाढतो. तसेच पोटाची चरबी देखील वाढते.

ह्रदय आणि किडणीवर परिणाम

एका संशोधनातून समोर आले की, दररोज एक ते दोन कप कोल्ड ड्रिंग्सचे सेवन केल्याने ह्रदयासंबंधित आजारांना आमंत्रण मिळते. त्याचा परिणाम किडणीवरही होतो. किडनीतील पेशींमध्ये घातक फ्री-रॅडिकल्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे शारिरीक आरोग्य देखील बिघडते.


हेही वाचा – करा ‘ही’ योगासने, रहा तणावापासून दूर


 

First Published on: January 2, 2021 4:16 PM
Exit mobile version