संध्याकाळी सातच्या आत जेवणं, खरचं हेल्दी आहे का?

संध्याकाळी सातच्या आत जेवणं, खरचं हेल्दी आहे का?

जर आपण कोणाही फिटनेस फ्रीक व्यक्तीला त्याच्या फिटनेसचे रहस्य विचारलं तर तो क्षणाचाही विलंब न करता त्याचे सकाळपासून ते रात्रीपर्यंतचे टाईमटेबलच आपल्यासमोर मांडतो. यात व्यक्तीनुसार काही फरक असला तरी एक गोष्ट मात्र कॉमन असते ती म्हणजे रात्रीचे जेवण या व्यक्ती संध्याकाळी सातच्या आत आटोपतात. तसेच तज्ज्ञ मंडळीदेखील रात्रीचे जेवण सातच्या आत करण्याचा सल्ला देतात.

सातच्या आत जेवणाच्या या नियमावर जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी अँड मेटाबॉलिज्ममध्येही सांगण्यात आले आहे. त्यानुसार दिवसभर आपण कामात असतो. त्यामुळे शरीराची हालचाल होते. खाल्लेले अन्न सहज पचते. पण रात्री शरीराची हालचाल नसते. त्यामुळे उशीरा खाल्लेले अन्न पचत नाही. अॅसिडीटी, मळमळ, पोटदुखीसारख्या समस्या निर्माण होतात. अन्न पचन न झाल्याने त्यातून फॅट्स तयार होतात. त्यामुळे वजन वाढण्याबरोबरच शुगर वाढण्याचाही धोका वाढतो. यामुळे संध्याकाळी सात पर्यंत जेवण घ्यावे आणि रात्री उशीरा जेवण करणे टाळावे. सातच्या आत जेवण केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

शुगर कंट्रोलमध्ये राहते

संध्याकाळी सातच्या सुमारास जेवल्याने इंन्सुलिन कंट्रोलमध्ये राहते. शुगरही वाढत नाही. त्यामुळे ग्लायसेमिक कंट्रोल करण्यास मदत मिळते.

शांत झोप लागते

संध्याकाळी लवकर जेवल्याने अन्न पचनही व्यवस्थित होते. त्यामुळे शांत झोप लागते.

हृदय सुदृढ राहते

संध्याकाळी लवकर जेवणे हृदयासाठीही फायदेशीर आहे.

चयापचय प्रक्रिया सुधरते. त्यामुळे हार्मोन्स समतोल राहतात.


हेही वाचा- झटपट वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय

First Published on: August 28, 2023 6:56 PM
Exit mobile version