अ‍ॅरेंज मॅरेज करत असाल घाबरू नका!

अ‍ॅरेंज मॅरेज करत असाल घाबरू नका!

Marriage

विवाहाच्या अपेक्षा –
प्रत्येक मुलीला आवडते की तिच्या होणार्‍या पतीने तिच्याकडून लग्नाविषयी सल्ला घ्यावा. यामुळे तुम्हालासुद्धा कळेल की, मुलगी आपल्या लग्नाविषयी काय विचार करते.

अशी करा प्रश्नाची सुरुवात –
तुमच्याप्रमाणेच मुलगीसुद्धा घाबरलेली, गोंधळलेली आहे. तुम्ही तिला उलट-सुलट प्रश्न विचारून जास्त नाराज करू नका. सर्वप्रथम तिला तिचे नाव, आवडी-निवडीबद्दल विचारा. जर तुम्हाला वाटले की, मुलगी खूपच लाजाळू आहे तर आधी स्वतःविषयी सांगण्यास सुरुवात करा. मग हळुहळू तिला बोलते करा. तुम्हाला कळून जाईल की, मुलगी कशी आहे.

करिअर –
मुलींना त्यांच्या करिअरबद्दल विचारल्यास खूप चांगले वाटते. तिला आपल्या करिअरबद्दल जोडीदार सिरीयस असल्याचा आनंद होतो. तुम्ही तुमच्या करिअरबद्दल सांगा. तसेच तिच्या करिअरबद्दलही विचारा. तिच्या इच्छा, ध्येय याबद्दल जास्तीत-जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

आवड –
मोकळ्या वेळेत तुला काय करायला आवडते? तुला कोणत्या गोष्टींमध्ये जास्त वेळ घालवण्यास आवडते? तिचे फ्रेंड सर्कल याविषयी थोडे जाणून घ्या. यामुळे तुम्हाला समजेल की ती कशी आहे.

आई-वडिलांविषयी –
ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आई-वडिलांची काळजी करता त्याप्रमाणे मुलीलासुद्धा आपल्या आई-वडिलांची काळजी असते. मुलीची काळजी कमी करण्यासाठी तुम्ही तिला विचारू शकता की, लग्नानंतर तुझ्या आई-वडिलांकडे कोण लक्ष देईल किंवा भविष्यात त्यांच्याविषयी काय विचार केला आहे.

First Published on: January 15, 2019 5:13 AM
Exit mobile version