थंडीत तुमचंही अंग ठणकतं का? करा ‘हे’ उपाय

थंडीत तुमचंही अंग ठणकतं का? करा ‘हे’ उपाय

हिवाळ्यात अनेकांना अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. शिवाय अंगदुखी किंवा सांधेदुखीच्या तक्रारी देखील निर्माण होतात. यामागचे कारण म्हणजे शारीरिकदृष्ट्या हालचाल कमी होणे. नियमीत व्यायाम न केल्यामुळे, स्नायू कमकुवत होतात. हिवाळ्यातील सुस्त जीवनशैलीमुळे शरीराचे दुखणे टाळण्यासाठी दर दोन तासांनी 5 मिनिटे तरी चालावे. जर तुम्ही नेहमी कामामुळे बसलेले असाल तर तुम्ही थोड्या-थोड्या वेळाने हालचाल करत राहा. शिवाय काही नियमांचे देखील पालन करा.

थंडीत अंग ठणकत असेल तर करा ‘हे’ उपाय

 

हिवाळ्यात आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी. फळे, भाज्या, कडधान्ये यांचा आहारात समावेश करा. या आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल तसेच इतर आजारांपासून संरक्षण होईल.

थंडीत फास्ट फूड खाण्यापासून लांब राहावे. शिवाय तेलकट आणि मसाल्याचे पदार्थ देखील खाऊ नये.

हिवाळ्यामध्ये अनेकजण पाणी कमी पितात. हे करणं शरीरासाठी हानिकारक आहे. हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे थकवा जाणवतात. अशावेळी गरम चहा किंवा सूप प्यायल्याने देखील शरीरातील उष्णता वाढवण्यास मदत होईल.

 


हेही वाचा :

सकाळच्या नाश्त्यामध्ये चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

First Published on: November 17, 2023 4:16 PM
Exit mobile version