Friday, May 10, 2024
घरमानिनीHealthतुम्हीही सतत मोबाईल बघता का ? मग होतील हे परिणाम

तुम्हीही सतत मोबाईल बघता का ? मग होतील हे परिणाम

Subscribe

सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियामुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी संपर्क साधणं सोप झालंय. तसंच जगातील प्रत्येक घडामोड जाणून घेणं शक्य झालं आहे. सोशल मीडियाचा रोजच्या आयुष्यासाठी फायदा होत असतानाच आता मात्र सोशल मिडियाच्या वापरामुळे काही दुष्परिणाम देखील समोर येऊ लागले आहेत. अलिकडे अनेकजण सोशल मीडियाच्या आहारी जात आहेत. सोशल मीडिया हे एक प्रकारचं व्यसन ठरू लागलं आहे.

अगदी लहानांपासून वृद्धांपर्यत प्रत्येत वयोगटातील व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करते. मात्र काहीजण सोशल मीडियामध्य दिवसरात्र वेळ घालवू लागले आहेत. अगदी सकाळी झोपेतून उठल्यावर सोशल मीडिया चेक केलं जातं. तर दिवसभर अगदी प्रवास करताना, जेवताना, वॉशरुममध्ये आणि रात्री उशीरापर्यंत सोशल मीडियाचा वापर अनेकजण करत आहेत. मात्र सोशल मीडियाच्या या अतिवापरामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येऊ लागलं आहे.

- Advertisement -

पोश्चर बिघडणं

सोशल मीडियामध्ये अनेकजण इतके गुंतून जातात की ते अनेक तास एकाच स्थितीमध्ये बसून राहतात. खास करून खांदे वाकवून किंवा बाक काढून अनेक तास बसून राहिल्याने शरीराच्या नसांवर ताण येतो. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. (social media side effects on health) तसंच सोशल मीडियाचा अतिवापर करणाऱ्यांमध्ये कमरेचं दुखणं वाढल्याचं समोर आलं आहे. काही वेळी हे कमरेचं दुखणं गंभीर स्वरुप देखील घेऊ शकतं.

- Advertisement -

सतत मोबाईल पाहिल्याने मान आणि डोळ्यांवर परिणाम

दिवसभर किंवा अनेकतास सतत मोबाईलमध्ये गुंग असलेले अनेकजण तुम्ही आजवर पाहिले असतील. अनेकतास मोबाईलमध्ये वाकून पाहिल्याने मानेच्या तसंच खांद्यांच्या आणि हातांमध्ये वेदना निर्माण होवू शकतात. (social media disadvantages) अलिकडे लोकांचा स्क्रिन टाइम वाढत चालला आहे. दिवसभर ऑफिसमध्ये कॅम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम केल्यानंतरही प्रवासात आणि झोपताना अनेक तास मोबाईलमध्ये सोशल मीडियाचा वापर केल्याने डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो. यामुळे कमी वयात चष्मा लागणं. तसंच दृष्टीसंबधीत समस्या वाढू लागल्या आहेत.

 

मानसिक आरोग्य धोक्यात

तसंच सोशल मीडियाचा शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सर्वात जास्त दुष्परिणाम होताना दिसत आहेत. यामुळे नैराश्य, चिंता,अनिद्रा अशा अनेक समस्या वाढत आहेत.

  • सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नैराश्य येत असल्याचं अभ्यासात समोर आलं आहे.
  • सोशल मीडियामुळे एकाकीपणा वाढून आत्महत्येची भावना निर्माण होवू लागते.
  • सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता असते.
  • मोबाईलमध्ये स्क्रोल केल्याने लक्ष केंद्रीत करण्यास अडचण निर्माण होते.

जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होणं, स्वप्नांच्या जगात रममाण होणं, नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणं अशा अनेक अडचणी सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे निर्माण होतात. मीडियाचा योग्य प्रकारे आणि नियमित वापर केल्यास नक्कीच तुम्हाला दैनंदिन आयुष्यात फायदा होईल. मात्र सोशल मीडियाच्या आहारी जाणं भविष्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे त्यावर वेळीच मर्यादा आणणं गरजेचं आहे.

- Advertisment -

Manini