Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthमुलांना शिळ्या कणकेच्या पोळ्या देणं घातक

मुलांना शिळ्या कणकेच्या पोळ्या देणं घातक

Subscribe

सकाळी लवकर शाळा, ऑफिस असलं की डबा बनवण्यासाठी प्रत्येक घरात तारांबळ उडते. अशावेळी वेळेत डबा बनवून व्हावा म्हणून अनेकजणी रात्रीच जास्तीचे पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात. हेच पीठ सकाळी पोळ्या करण्यासाठी वापरले जाते. परंतु सतत फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या खाणं आरोग्यासाठी घातक मानलं जातं. या कणकेच्या पोळ्यांचा मुलांच्या आरोग्यावरही खूप घातक परिणाम पाहायला मिळू शकतो.

How to Proof Dough Quickly

- Advertisement -
  • पोटदुखीचा त्रास

शिळं अन्न खाऊ नये असं म्हणतात. शिळं अन्न खाल्यामुळे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. तसंच त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. फ्रीजमध्ये भिजवून ठेवलेल्या पीठापासून तयार केलेल्या पोळ्या कडक होतात. त्यामुळे अशा पोळ्या खाल्ल्याने पोट दुखतं.

  • पोळ्यांची चव कमी होते

फ्रीजमध्ये भिजवून ठेवलेली कणिक दुसऱ्या दिवशी थोडीशी काळसर रंगाची दिसायला लागते. त्यामुळे शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो.भिजवलेलं पीठ बराच वेळ तसं ठेवल्यामुळे त्यात अंबविण्याची प्रक्रिया सुरु होते. भिजवलेल्या पीठामध्ये काही बॅक्टेरिया आणि हानिकारक रसायन तयार होतात. त्यामुळे पोळ्या लवकर खराब होतात.

- Advertisement -

HOW TO MAKE ROTI/CHAPATI - The Shazia Blog

  • पोषकतत्व कमी होतात

पीठ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यात असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे खराब होतात, ज्यामुळे पिठाचे पौष्टिक मूल्य कमी होते. जर तुम्हाला पीठ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचे असेल तर ते 6-7 तासांपेक्षा जास्त ठेवू नका.

  • ऍसिडिटीचा त्रास

पिठात ओलावा असल्याने, बॅक्टेरिया आणि बुरशी दोन्ही वाढण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. त्यामुळे पोटात संसर्ग होण्याची शक्यता असते. रेफ्रिजरेटरमध्ये खूप पूर्वी ठेवलेले मळलेले पीठ देखील गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचे कारण बनते. पीठ मळताना फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर मळताना जास्त पाणी घालू नये. यामुळे पीठ लवकर खराब होऊ शकते. थोडेसे पाणी घालावे याची खात्री करा. ओल्या पीठात आणखी कोरडे पीठ घालून ते घट्ट करण्याचा प्रयत्न करा.

 


हेही वाचा :

अंडी उकडलेली खाणं जास्त फायदेशीर की ऑम्लेट?

- Advertisment -

Manini