ब्रेस्ट फिडींग करताना कोणती काळजी घ्यावी?

ब्रेस्ट फिडींग करताना कोणती काळजी घ्यावी?

ब्रेस्ट फिडींग

जन्माला आलेल्या प्रत्येक नवजात बालकाला सर्वप्रथम आईचे दूध द्यावे लागते. कारण आईचे दूध हे बाळासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. सुरुवातीचे सहा महिने तरी बाळाला आईचे दूध दिल्यास बाळ सुदृढ राहते. त्याचबरोबर बाळाला स्तनपान केल्याने त्याचा आईला देखील फायदा होतो. हे फायदे केवळ शारीरिक नसून मानसिक असतात. यामुळे आई आणि बाळामधील बंध घट्ट होण्यास मदत होते. परंतु, अनेकदा पहिल्यांदा आई झालेल्यांना बाळाल दूध कसे पाजावे. दूध पाजताना कोणती काळजी घ्यावी हे कळत नाही. त्यामुळे बऱ्याचदा बाळाचे पोट भरत नाही आणि बाळ उपाशी राहते. चलात तर जाणून घेऊया ब्रेस्ट फिडींग करताना कोणती काळजी घ्यावी.

दूध पाजताना जमिनीवर बसा

बऱ्याचदा अनेक महिला दूध पाजताना उंचावर बसतात. खुर्ची किंवा बेडवर शक्यतो बसू नये. बाळाला दूध पाजताना आईने जमिनीवर चादर टाकून मांडी घालून बसावे. तसेच दूध पाजताना बाळाच्या डोक्यावरुन हात फिरवत रहावे. यामुळे बाळ शांत झोपते.

बाळाला नीट पकडा

लहान बाळाला दूध पाजताना त्यांना नीट धरायला हवे. आईला बऱ्याचदा बाळाला दूध पाजताना कसे पकडावे हे ठाऊक नसते. त्यामुळे घरातील मोठ्या महिलांकडून नीट माहिती घेऊन बाळाला दूध पाजावे.

दूध पाजून झाल्यावर उभे धरावे

बाळाला दूध पाजून झाले की, त्या बाळाला उभे करावे आणि त्या बाळाच्या पाठीवरुन हात फिरवावा. अनेकदा बाळाला दूध पाजले की, बाळाच्या तोंडातून दूध बाहेर येते. त्यामुळे बाळाला दूर पचण्यासाठी त्याला उभे पकडावे.

बाळाच्या हालचालीकडे लक्ष द्यावे

बऱ्याचदा बाळाला दूध पाजल्यानंतर देखील बाळ तोंडात अंगठा किंवा हाताची बोटे तोंडात टाकतात. त्यावेळी बाळाला भूक लागली असून त्याचे पोट पूर्ण भरलेले नाही हे समजावे. त्यामुळे आईने बाळाच्या हालचालीकडे लक्ष द्यावे.

First Published on: December 14, 2019 6:30 AM
Exit mobile version