पीरियड्सपूर्वी ‘या’ कारणास्तव होते फूड क्रेविंग्स

पीरियड्सपूर्वी ‘या’ कारणास्तव होते फूड क्रेविंग्स

पीरियड्सपूर्वी आणि पीमएसच्या स्थितीत महिलांच्या शरीरात काही बदल होतात. या हार्मोनल बदलावांचा परिणाम महिलांच्या रुटीन, एनर्जी लेव्हल, खाण्यापिण्याच्या सवयीवर आणि मूडवर होतो. ऐवढेच नव्हे तर सध्या महिलांच्या झोपेच्या वेळेत आणि पॅटर्नमध्ये बदल झाला आहे.

पीरियड्सपूर्वी महिलांमध्ये एक्ने, गॅस आणि ब्लोटिंग होणे, चिडचिड होणे, अधिक इमोशनल वाटणे अशा गोष्टी घडतात. काही महिलांना तर या दरम्यान गोड खावेसे वाटते. काही महिलांना तर तिखट खावेसे वाटते आणि काहीजणी तर गरजेचेपेक्षा अधिक खातात. असे होण्यामागे नक्की काय कारण आहे याबद्दल तज्ञ काय म्हणतात हे पाहूयात.

पीरियड्सपूर्वी का होते फूड क्रेविंग्स?
पीरियड्सपूर्वी महिलांच्या शरीरात हार्मोन्सचा स्तर वरखाली होतो. याच कारणास्तव फूड क्रेविंग होते. पीरियड्सपूर्वी एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन हार्मोनच्या स्तरात अंतर असल्याने सेरोटोनिन हार्मोनचा स्तर कमी होऊ लातो. हे एक हॅप्पी हार्मोन आहे. याचा स्तर कमी झाल्याने महिलांमध्ये मूड स्विंग्स होतात. याच कारणास्तव महिलांमध्ये कार्ब्स आणि रिफाइंड फूड खाण्याची इच्छा होते.

पीएमएस म्हणजे काय?
पीएमएस म्हणजे प्रीमेंस्ट्रुअल सिंड्रोम, ज्याची लक्षणे महिलांमध्ये पीरियड्सपूर्वी 7-10 आधी दिसून येतात. काही महिलांमध्ये काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. तर काही महिलांना पीएमएसचा फार त्रास होतो. त्या आपल्या डेली रुटीन व्यवस्थितीत फॉलो करू शकत नाही. पीएमएसमध्ये पिंपल्स, मूड स्विंग्स, ब्रेस्ट टेंडरनेस, फूड क्रेविंग्स, थकवा, डोकेदुखी आणि पोटासंबंधित समस्या होऊ लागतात.


हेही वाचा- वाढत्या वयात वेट लॉस आहे चॅलेंजिंग

First Published on: November 4, 2023 1:10 PM
Exit mobile version