Thursday, May 16, 2024
घरमानिनीBeautyMonsoon: पावसाळ्यात अशी घ्या पायांची काळजी

Monsoon: पावसाळ्यात अशी घ्या पायांची काळजी

Subscribe

पावसाळ्यात आपण स्किन केअर ते नखांची काळजी घेतो. असे करणे या ऋतूत फार महत्त्वाचे असते. अन्यथा विविध फंगल इंन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक वाढली जाते. खरंतर पावसाळ्यात आपले पाय ओलसर राहतात. त्यामुळे काही आजार होण्याची भीती असते. अशातच पावसाळ्यात पायांची काळजी कशी घेतली पाहिजे याच संदर्भातील खास टीप्स पाहूयात. (Foot care in monsoon)

-पायांची स्वच्छता दररोज करा. जेव्हा घराबाहेरुन येता तेव्हा मेडिकेटेड साबणाने पाय धुवा आणि स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर अँन्टीफंगल पावडरचा वापर दररोज करा.
-पावसाळ्यात पायांना कँडीडायोसिसची समस्या होऊ शकतते. याचे कारण वातावरणातील ओलावा, वारंवार पाय ओलेसर होणे, बूटांमध्ये पाणी राहणे असे. असे झाल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
-नियमित पेडीक्योर केल्याने पाय मऊ आणि कोमल राहतात. यामध्ये पायांच्या बोटांची स्वच्छतेसह पायांना मसाज ही केले जाते.
-पायांची नखं वेळोवेळी कर्व शेपमध्ये कापा. जेणेकरुन त्यात घाण अडकली जाणार नाही. नखं कापताना क्युटिकल्स कापू नका.
-नेहमी उत्तम फुटवेअर घाला.
-आजकाल पायबंद फुटवेअर बाजारात मिळतात. ते थोडे स्टाइलिश ही असतात. यामध्ये गम बूट, स्ट्रॅपर, रबराचे चप्पल आवडीने घातले जातात.
-चप्पल नेहमीच हाय हिल्सच्या घालू नयेत.

- Advertisement -

दरम्यान, जर तुम्ही दररोज ऑफिसला जात असाल तर तेथे गेल्यानंतर पायातील चप्पल थोडावेळ काढून ठेवा.जेणेकरून पाय सुकतील. घरी आल्यानंतर हलक्या कोमट पाण्यात एक चमचा व्हिनेगर मिक्स करुन अर्धा तास पाय त्यात बुडवून ठेवा. त्यानंतर टॉवेलने पाय स्वच्छ पुसून घ्या. फंगस पासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा सुद्धा वापर करू शकता. यामुळे पीएच बॅलेन्स होण्यास मदत होते.


हेही वाचा- Foot care in monsoon: पावसाळ्यात पायांची अशी घ्या काळजी

- Advertisment -

Manini