गुलाबी, मुलायम ओठांसाठी

गुलाबी, मुलायम ओठांसाठी

lip

थंडीत ओठ फाटणे, भेगा पडणे या समस्यांमुळे आपले ओठ रुक्ष दिसतात. यावर उपाय म्हणून आपण केमिकलयुक्त क्रिम्सचा वापर करतो. त्यामुळे क्रिम्सचा वापर करेपर्यंत ओठ सुंदर दिसतात. मात्र काही वेळाने पुन्हा ओठांचे सौंदर्य नाहीसे होते. त्यामुळे आपण निराश होतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या स्वयंपाकघरातील पदार्थांचा वापर करूनही आपण ओठांचे सौंदर्य सहज खुलवू शकतो. ओठांचे सौंदर्य खुवलविण्यास मदत करतील अशा टिप्स पुढीलप्रमाणे.

दुधाची साय – घरात दूध सहज उपलब्ध असते. दुधाच्या सायीमध्ये फॅट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. हे फॅट्स मॉईश्चरायझरचे काम करतात. फाटलेल्या, भेगा पडलेल्या ओठांवर दिवसातून तीन वेळा साय लावावी. असे केल्याने ओठ मुलायम होऊन गुलाबी दिसतात.

तूप – एक चमचा तुपात एक चुटकी मीठ टाकून हे मिश्रण गरम करावे. मिश्रण थंड झाल्यावर दिवसातून ५ ते ६ वेळा हे मिश्रण लीप बामप्रमाणे ओठांवर लावून हलक्या हाताने मालिश करा. तसेच रोज रात्री ओठांवरून तुपाचा हात फिरवावा, त्यामुळे ओठ मुलायम होतात.

मध, साखरेचा मसाज – एक चमचा मधात दोन चमचे साखर मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण दोन मिनिटे ओठांवर लावून ठेवा. त्यानंतर बोटाने हळूवार ओठांवर मसाज करा. थोड्या वेळाने साध्या पाण्याने ओठ धुवून टाका. असे केल्याने ओठांवरील मृत त्वचा निघून जाऊन ओठ मुलायम होतात.

भोपळ्याची पेस्ट – एक चमचा भोपळ्याची पेस्ट त्यात एक चमचा नारळ तेल तसेच एक चमचा मध याचे मिश्रण करा. स्मूथ पेस्ट फ्रीजमध्ये थंड करा. हा थंड बाम दिवसातून ३-४ वेळा लावा ओठ मुलायम व आकर्षक होतील.

First Published on: February 7, 2019 4:41 AM
Exit mobile version