केसांना फाटे फुटू नयेत यासाठी

केसांना फाटे फुटू नयेत यासाठी

combing knotted hair

केसांना फाटे फुटणे ही नवी समस्या नाही. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही योग्य पावलं उटलली आहेत का? तर हीच योग्य वेळ आहे. केसांची देखभाल घेण्याची. जेणे करुन केस घनदाट, निरोगी आणि चमकदार होतील. बाजारात अनेक प्रकारचे कंडिशनर उपलब्ध आहेत. तुमच्या केसांच्या गरजेनुसार कंडिशनर निवडा. याशिवाय दुसरा उपाय म्हणजे ट्रिमिंग करणे. तीन महिन्यातून एकदा केसांना ट्रिमिंग अवश्य करा.यामुळे केस घनदाट आणि सुंदर होतात. जर तुम्ही घाईत असाल आणि फाटे फुटलेले केस लपवू इच्छित असाल तर स्टाईलिंग क्रिम किंवा पेट्रोलियम जेली हातावर घेऊन केसांच्या खालील बाजूस लावा. जास्त प्रमाणात औषधांचे सेवन, तणाव, चुकीचे डाएट, हार्मोनल असंतुलन यामुळए तैलग्रंथीमधील संतुलन बिघडतं. केसांमधील अतिरिक्त तेल दूर करण्यासाठी माईल्ड शाम्पूने रोज केस धुवा. मग केसांच्या मुळाशी लाईट कंडिशनर लावा. जर तुमच्याकडे रोज केस धुण्यासाठी वेळ नसेल तर डोक्याच्या त्वचेवर बेबी पावडर लावा.यामुळए केसांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यास मदत होते. मग ब्रशने ती पावडर झाडा.

आठवड्यातून एकदा क्लॅरिफाईंग शांपूचा वापर करा. हा पहिल्यांदा कोरड्या केसांवर लावा, मग पाण्याने केस धुवा. चुकीच्या पद्धतीने केलेला मसाज, कठोर शाम्पूचा केलेला वापर आणि चुकीचा आहार या सगळयांमुळे केस निर्जिव होतात. केसांना मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी ग्लॉसी सिरमचा वापर करा.

First Published on: December 17, 2018 5:00 AM
Exit mobile version