परिपूर्ण शरीरासाठी

परिपूर्ण शरीरासाठी

आपले शरीर परिपूर्ण असावे, असे प्रत्येकालाच वाटते. हीच इच्छा तुमचीही असेल तर या गोष्टींकडे लक्ष द्या. बदलत्या जीवनशैलीने लोकांना लठ्ठपणा जणू भेट दिला आहे. छोट्या-छोट्या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे शरीर पिळदार बनवू शकता.

* दिवसाची सुरुवात पौष्टिक आणि भरपूर न्याहरीने करा. न्याहरी केल्यास तुमचा मेटाबॉलिझम रेट (चयापचय दर) उत्तम राहतो आणि तुमची ऊर्जा पातळीही नियंत्रित राहते.

* परिणामकारकरित्या वजन कमी करण्यासाठी डबल टोन्ड फुल क्रीम दूध किंवा स्किम्ड दूध घेण्यास सुरुवात करा.

* दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी प्यावे.

* वजन कमी करण्यासाठी कॅलरी (उष्मांक) असलेल्या शीतपेयांचे सेवन करू नये. जर शीतपेय प्यायचेच असेल तर कमी उष्मांक असलेली किंवा डायट शीतपेये घ्यावीत.

दिवसभरातील जेवणाची चार भागांत विभागणी करावी. तुमच्या जेवणाच्या अर्ध्या भागात भाज्या, एक चतुर्थांश भागात स्टार्चयुक्त (पिष्ठसत्त्व) जेवण आणि उर्वरित एक चतुर्थांश भागात मटन (मांसाहारी असाल तर) असले पाहिजे. जर शाकाहारी असाल तर भाज्यांचे प्रमाण वाढवावे.

* लोकांना अनेकवेळा भूक लागल्यासारखे वाटते, परंतु वास्तविक त्यांना तहान लागलेली असते. त्यामुळे तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा सर्वात आधी एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे तुमचे पोट भरल्यासारखे वाटेल.

* नेहमी दुपारी तीन-चार वाजण्याच्या सुमारास ऊर्जा पातळी मंदावते. यावेळी स्नॅक्स खावेत. तसेच कमी मेद असलेले दही किंवा थोडेसे बदाम किंवा आक्रोडचे सेवन करता येईल.

First Published on: December 3, 2018 5:58 AM
Exit mobile version