गॅस आणि acidity ने त्रस्त आहात, मग करा हे उपाय

गॅस आणि acidity ने त्रस्त आहात, मग करा हे उपाय

अधिक मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने काही वेळेस अॅसिडिटी आणि गॅसची समस्या होते. असे झाल्यानंतर बैचेन वाटणे, उलटी येणे,ब्लोटिंग, छातीत जळजळणे अशा समस्या होऊ शकतात. गॅस आणि अॅसिडिटीची समस्या तुम्हाला कधीही होऊ शकते. अॅसिडिटी दूर करण्यासाठी काही जण औषधं सुद्धा घेतात. मात्र काहीजण घरगुती उपाय ही करतात. अशातच गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्येवर तुम्ही पुढील काही घरगुती उपाय करुन पाहू शकता. (Gas and acidity problem)

-ओवा ठरेल फायदेशीर


ओवा अॅसिडिटीच्या समस्येपासून तुम्हाला दूर ठेवेल. ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या असेल त्यांनी ओव्याचे पाणी प्यावे. यासाठी तुम्ही एका बाउलमध्ये 2-3 चमचे ओवा आणि काळं मीठ मिक्स करा. ते पाणी उकळून घ्या. जेव्हा पाणी कोमट होईल तेव्हा तुम्ही ते प्या.

-हिंग


प्रत्येकाच्या किचनमध्ये मसाल्याच्या डब्ब्यात हिंग असतेच. ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या आहे त्यांनी कोमट पाण्यात हिंग टाकून प्यावे. यामुळे अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळेल.

-आल्याचे पाणी


आल्यात असलेले गुण अॅसिडिटी कमी करण्यास फायदेशीर ठरेल. यासाठी आल्याचे काही तुकडे पाण्यात उकळवून घ्या आणि जेव्हा ते उकळले जातील तेव्हा ते पाणी गाळून प्या.

-छास प्यास


जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर छास प्या. यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड अॅसिडिटीची समस्या दूर करतो.

-काळीमिरी


गॅस झाला असेल तर काळी मिरी खा. यासाठी दूधात काळी मिरीची पूड टाकून ते प्या.


हेही वाचा- औषध वेळेवर का घ्यावी ? वाचा

First Published on: July 23, 2023 2:05 PM
Exit mobile version