Tuesday, February 27, 2024
घरमानिनीHealthरूट कॅनलच्या दुखण्यापासून अशी मिळवा सुटका

रूट कॅनलच्या दुखण्यापासून अशी मिळवा सुटका

Subscribe

दात दुखू लागल्यास डोकं, हिरड्या भयंकर दुखतात. अनेकदा रुट कॅनलचे अनेक उपचार केले तरीही अनेकदा याचा काहीच फायदा होत नाही. अशावेळी तुम्ही रुट कॅनलचा त्रास दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय नक्कीच करु शकता.

रुट कॅनलचा त्रास दूर करण्यासाठी उपाय

Do Root Canals Hurt? Here's The Unfiltered Truth | Locust Family Dentistry

- Advertisement -
  • बर्फ लावा

बर्फ दुखणार्‍या जागेवर लावा. याने ती जागा सुन्न होईल आणि त्रास होणार नाही. पण 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बर्फ ठेवणे घातक ठरू शकते.

  • मीठ

कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाकून दिवसातून दोन वेळा पाण्याने गुळण्या करा. पाण्याला थुंकण्या अगोदर दुखणार्‍या जागेवर थोडावेळ नक्की ठेवा.

- Advertisement -
  • अल्कोहोल

अल्कोहोल असणारे पेय बीअर किंवा व्हिस्कीने गुळण्या करा हे सुध्दा फायदेशीर असते. यामुळे फक्त इन्फेक्शनच थांबणार नाही तर ती जागा सुन्न होईल आणि वेदना कमी होतील.

5 Quick Tips To Help You Recover Faster After A Root Canal

  • काकडी

काकडीमुळे तुमच्या वेदना कमी होऊ शकतात. ताज्या काकडीचे तुकडे वेदना होणार्‍या जागेवर ठेवा. यामुळे त्या ठिकाणी थंड वाटेल आणि दुखणे कमी होईल.

  • ऑलिव्ह ऑईल

कापसाला ऑलिव्ह ऑईलमध्ये भिजवून दुखणार्‍या जागेवर ठेवा. यामुळे दुखण्यापासून आराम मिळेल. ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटी-इन्फ्लामेटरी तत्त्व असतात जे दुखणे आणि सूज कमी करतात.

  • लवंग तेल

लवंगमध्ये अँटी-इन्फ्लामेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टीक तत्त्व असतात. यामुळे दाताच्या वेदना कमी होतात.


हेही वाचा :

खोकल्याने हैराण झालात? मग करा ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini