Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Kitchen घरच्या घरी असा बनवा कुरकुरीत घेवर

घरच्या घरी असा बनवा कुरकुरीत घेवर

Subscribe

पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्याचसोबत ऑगस्ट महिन्यात सण सुद्धा आहेत. श्रावण आणि रक्षाबंधनाचा सण ऑगस्ट महिन्यात असल्याने तुम्ही राजस्थान मधील प्रसिद्ध मिठाई घेवर बनवू शकता. घरच्या घरी घेवर कसा बनवायचा याची रेसिपी पाहूयात.

- Advertisement -

साहित्य-
3 कप बेसन पीठ
2 चमचे तूप
3-4 बर्फाचे तुकडे
4 कप पाणी
1/4 टी स्पून पिवळा रंग
डीप फ्रायसाठी तूप

सिरपसाठी
-एक कप साखर
-एक कप पाणी

- Advertisement -

टॉपिंगसाठी
1 टीस्पून वेलची पावडर
1 टीस्पून बदाम आणि पिस्ता
-एक मोठा चमचा दूधात केसर दूध आणि केसर

कृती
-घेवर बनवण्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम एक तार असणारी गाळणी घ्या
-त्यानंतर बाउलमध्ये तूप आणि बर्फाचे तुकडे टाका. तूप हलवत रहा आणि जर चिकटत असेल बर्फाचे तुकडे टाकत रहा. जो पर्यंत ते सफेद होत नाही.
-त्यानंतर दूध, बेसनाचे पीठ आणि पाणी मिक्स करुन पातळ मिश्रण तयार करा. थोड्याश्या पाण्यात पिवळा रंग मिक्स करा. मिश्रण पातळ असावे.
-त्यानंतर एक स्टीलचे भांडण घेऊन त्यात अर्धा भांड तूप टाका आणि गरम करा
-जेव्हा तूपातून धुर निघू लागेल तेव्हा 50 मि.ली. ग्लासात मिश्रण भरुन भांड्यात टाका, एक पातळ धारेप्रमाणे.
-त्यानंतर मिश्रणाला व्यवस्थितीत जमा होऊ द्या, तो पर्यंत आणखी एक ग्लास मिश्रण किनाऱ्यावरून टाका.
-घेवर भांड्याला चिकटणार नाही आणि त्यामध्ये लहान लहान छेद दिसू लागतील.
-चाळणी एका मोकळ्या भांड्यात ठेवा
-गरम गोड पाकात बुडवून बाहेर काढा आणि अधिक पाक काढून टाकण्यासाठी त्याच्या तारेवर लक्ष द्या
-थंड झाल्यानंतर घेवरवर सिल्वर फॉइल लावा. त्यानंतर केसर टाका. कापलेले ड्राय फ्रुट्स आणि चिमूटभर वेलची पावडर टाका.


हेही वाचा- Wheat Kheer : झटपट बनवा गव्हाची टेस्टी खीर

- Advertisment -

Manini