Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन स्वरा भास्करने केली बाळाच्या आगमनाची तयारी; फोटो व्हायरल

स्वरा भास्करने केली बाळाच्या आगमनाची तयारी; फोटो व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद मागील काही महिन्यांपूर्वी विवाह बंधनात अडकले. स्वरा आणि फहादचे लग्न अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्वराने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. यावेळी स्वराने तिच्या पतीसोबतचा एक फोटो शेअर केला होता ज्यात तिचे बेबी बंप देखील दिसत होते. दरम्यान, अशातच स्वराने आणखी एक नवा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये स्वराने बाळाच्या आगमनाची तयारी केल्याचे दिसत आहे.

स्वरा भास्करने केली बाळाच्या आगमनाची तयारी

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

नुकताच स्वराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यातील पहिल्या फोटोमध्ये बाळासाठी पाळणा ठेवल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये या पाळण्यामध्ये मांजर बसलेली दिसत आहे. “हा फोटो शेअर करत स्वरा भास्करने लिहिलंय की, आपल्या खोलीमध्ये बाळाच्या येण्यापूर्वी पाळणा लावला आहे. पाळण्याचा पहिला मालक आता पाळणा सोडण्यासाठी तयार नाही. फहाद अहमदचं तुमचे पहिले मुल” असं स्वराने लिहिलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती सपा नेता फहाद अहमद 16 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. त्यावेळी त्यांनी कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर मार्चमध्ये कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थित त्यांनी धूमधडाक्यात लग्न केले.

कोण आहे फहाद जिरार?

स्वरा भास्करने फहाद जिरार अहमदसोबत फेब्रुवारी पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं. स्वराचा पती तिच्या पेक्षा वयाने 4 वर्षांपेक्षा लहान आहे. तिचा पती समाजवादी पक्षाचा नेता आहे. त्यांची पहिली भेट 2019 मध्ये झालेल्या आंदोलनात झाली. तिथेच त्यांची चांगली ओळख झाली. पुढे हळूहळू मैत्री, त्यानंतर प्रेम आणि आता त्याचे रुपांतर लग्नात झाले आहे.


हेही वाचा : … तर तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान असेल; खोपकरांचा रणदीप हुड्डाला इशारा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -