घरक्राइमनाइट क्लबमध्ये गैरवर्तन करणारे गोव्याचे डीआयजी पदमुक्त, गृह मंत्रालयाला दिली माहिती

नाइट क्लबमध्ये गैरवर्तन करणारे गोव्याचे डीआयजी पदमुक्त, गृह मंत्रालयाला दिली माहिती

Subscribe

पणजी : गोव्यात तैनात असलेले आयपीएस अधिकारी ए कोआन यांना एका नाइट क्लबमध्ये महिलेशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून उपमहानिरीक्षक (डीआयजी) पदावरून मुक्त करण्यात आले आहे. यासोबतच त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

ए कोआन यांनी दारूच्या नशेत महिलेशी गैरवर्तन केले. यावरून संतापलेल्या त्या महिलेने आयपीएस अधिकाऱ्याला थप्पड मारली आणि कानउघाडणी केली. कळंगुट येथील एका पबमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयपीएस ए कोआन हे दिल्ली पोलिसांत डीपीसी होते. संबंधित महिला देखील दिल्लीची रहिवासी असून ती गोव्याला पर्यटनासाठी आल्याचे सांगण्यात येत आहे. कोआन इतके नशेत होते की त्यांना ठीकपणे चालताही येत नव्हते, असे सीसीटीव्हीत आढळले.

हेही वाचा – ‘ईडी ही दहशतवादी संघटना’; संजय राऊतांचा घणाघात

- Advertisement -

विशेष म्हणजे, काल, बुधवारी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी कोणाचेही नाव न घेता म्हटले होते की, राज्यात तैनात असलेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याने नाइट क्लबमध्ये एका महिलेशी गैरवर्तन केले. त्याला तत्काळ निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

हेही वाचा – …तर तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान असेल; खोपकरांचा रणदीप हुड्डाला इशारा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, असले प्रकार सहन केले जाणार नाहीत असे सांगत, संबंधित आयपीएस अधिकाऱ्यावर कडक कारवाईचे आश्वासन दिले. आयपीएस अधिकाऱ्याच्या या वर्तणुकीबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाला कळवण्यात आले असून निर्णय गृह मंत्रालय घेईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना या डीआयजीपदावरून मुक्त करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -