आपल्या माणसांना वेळ द्या !!

आपल्या माणसांना वेळ द्या !!

जसे जसे बालपण संपत जाते तसे-तसे कुटुंब आणि मित्रांमधील दुरावा वाढत जातो. पर्सनलपासून तर प्रोफेशनल लाइफ इतकी व्यस्त होते की, मित्र आणि नातेवाइकांसाठी वेळ काढणे अवघड होऊन जाते. सुट्टीचा दिवस आराम करण्यासाठी वाचवून ठेवतात आणि बाकीचे अर्ध्यापेक्षा जास्त दिवस ऑफिसमध्ये. लाईफ यामुळे बोरिंग होते. कारण कोणाला भेटण्यासाठी वेळ मिळत नाही. तर मग असे काय केल्याने पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये संतुलन बनवता येईल. आज आपण यासाठी काही खास टिप्स पाहणार आहोत… चला तर मग पाहूया या कोणत्या पध्दती आहे.

संपर्कात रहा

व्यस्त आयुष्यात मित्र आणि आपल्या स्पेशल माणसांच्या संपर्कात राहणे खूप अवघड होऊन जाते. परंतु यांच्यासोबत फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कात राहता येते. व्यस्त आयुष्यातून थोडा वेळ काढून बोलल्याने जवळीक टिकून राहते. इंटरनेटच्या जमान्यात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, ज्या तुम्हाला जोडून ठेवतील.

वेळ काढा

व्यस्त आयुष्यात कोणासाठीही वेळ काढणे हे खरेच अवघड असते, परंतु तुम्ही प्रयत्न नक्की करा. पूर्ण दिवस वेळ काढलात नाही तरी चालेल, परंतु लंच किंवा डिनर तरी सोबत करा.

लक्ष विचलित करु नका

हायफाय टेक्नॉलॉजीने सर्वांना स्वत:वर डिपेंडन्ट बनवले आहे. अर्ध्यापेक्षा जास्त काम फोन आणि कॉलवर होऊन जातात, परंतु याचा अर्थ असा नाही की, जुन्या मित्रांना भेटायला गेल्यावर फोन कॉलवर अ‍ॅक्टीव्ह राहावे. थोडा वेळ ते बंद ठेवा आणि आपसातील बोलणे चालू ठेवून जुन्या आठवणी ताज्या करा.

कमी बोला, जास्त ऐका

ऐकण्याची सवय लावा, ही तुमची पर्सनॅलिटी सांगण्याचा एक चांगला उपाय असतो. यासोबतच समोरच्यालाही वाटते की, तुम्ही त्याची काळजी करता. सतत बोलणे, कोणाचेच न ऐकणे हे तुमचा अ‍ॅटीट्यूड दाखवते.

लक्ष द्या

कोणी बोलत असल्यावर त्यांच्याकडे लक्ष न देता टीव्ही पाहणे, वर्तमानपत्र वाचणे, मोबाईल वापरणे यावरुन कळते की तुमचे लक्ष नाही. यामुळे समोरच्याला दु:ख होते आणि नात्यात दुरावा येतो.

वेळेवर पोहोचा

एखाद्याला भेटण्याची वेळ दिली असेल तर वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करा. जर वेळेवर पोहोचलात नाही तर समोरच्या व्यक्तीच्या मनात शंका निर्माण होते. जर खरंच तुम्हाला रिलेशनशिपला पुढे न्यायचे असेल तर वेळेचे महत्त्व ओळखा.

वागण्यात बदल

थँक्यू, प्लीज, सॉरी या शब्दांचा लहान मोठ्यांसोबत बोलताना नक्की वापर करा. हे तुमच्या स्वभावाची पॉझिटीव्हीटी दर्शवतात.

First Published on: September 13, 2018 12:21 AM
Exit mobile version