लांबसडक केसांसाठी लावा द्राक्षांच्या बियांचे तेल

लांबसडक केसांसाठी लावा द्राक्षांच्या बियांचे तेल

द्राक्षच नव्हे तर त्याच्या बिया सुद्धा फायदेशीर असते. या बिया केसांसाठी उत्तम असतात. द्राक्षाच्या बियांमध्ये अँन्टीऑक्सिडेंट गुण असतात. त्याचसोबत व्हिटॅमिन ई आणि फॅटी अॅसिड ही असते. त्या केसांसह आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि यामुळे केस वाढण्यास मदत होते. याच्या बियांचे तेल केसांसबंधित काही समस्या दूर करतात. द्राक्षाच्या बियांचा वापर करुन केसांना अन्य कोणते फायदे होतात हे सुद्धा पाहूयात.

केसांना कंडीशन करते
द्राक्षाच्या बियांमध्ये फॅटी अॅसिडसह व्हिटॅमिन ई असते. हे तेल केसांना मॉश्चराइज करते. त्याचसोबत केसांच्या मूळांना पोषण देण्याचे काम करते. याचा दररोज वापर केल्यास केसांमधील ड्रासनेस दूर होतो. केस तुटणे किंवा स्पिल्टेंसची समस्या दूर होते. हे तेल केसांना मॉइश्चराइज आणि कंडीशन करते. केसांची मूळ मजबूत होतात.

मजबूत केसांसाठी
या तेलात लिनोलिक अॅसिड असते. हे एक महत्त्वाचे फॅटी अॅसिड आहे. ते केसांची वेगाने वाढ करुन केसांना मजबूत करते. या तेलाचा वापर करून केस पातळ होण्याची समस्या ही दूर होते.

केस डॅमेज होण्यापासून दूर राहता
द्राक्षांच्या बियांमध्ये अँन्टीऑक्सिडेंट गुण असतात. त्यामुळे केसांना धूळ आणि प्रदुषणापासून दूर राहण्यास मदत होते. त्याचसोबत केस हानिकारक युवी किरणांपासून दूर राहता.

असा वापर करा
शॅम्पू करण्यापूर्वी अर्धा तास तेल लावा. अर्ध्या तासांनी केस धुवा. जेणेकरुन तुमचे केस मऊ होतील.


हेही वाचा- हेल्दी केसांसाठी ऑलिव्ह ऑईल आहे वरदान

First Published on: September 15, 2023 1:16 PM
Exit mobile version