आल्याचा गुळाम्बा , केसातील कोंड्यावर औषध

आल्याचा गुळाम्बा , केसातील कोंड्यावर औषध

आल्याचा गुळाम्बा

थंडी सुरू झाली की आल्याच्या वड्या आठवतात. प्रत्येक ऋतूत प्रत्येक प्रदेशात काही वेगळं केलं जातं.
आता हा गुळाम्बा पाहा, झटपट होतो आणि टिकतोही!

साहित्य- आलं आणि गूळ

कृती-

*आलं स्वच्छ धुवून घ्या. त्याची सालं काढून किसणीवर किसून घ्या.

*शक्यतो किसूनच घ्या म्हणजे त्यातले दोर किसणीवर राहतात ते फ्रीजमध्ये ठेवा आणि चहात वापरा. आल्याचा कीस वाटीने मोजा.

* एका वाटीला दीड वाटी या प्रमाणात बारीक चिरलेला गूळ मिक्स करा. अर्धा तास तसंच ठेवा.

*आल्याला पाणी सुटेल. आता पातेलं गॅसवर ठेवून द्या. उकळू द्या.

*गूळ विरघळला की थेंब डिशमध्ये टाकून पसरत नाही ना पाहा. आता उतरून गार झाला की काचेच्या बरणीत भरून ठेवा. थंडीत चमच्याने घेऊन खाऊ शकता.

आल्याच्या तिखटपणावर गुळाचे प्रमाण कमी जास्त करा.

केसातील कोंड्यावर औषध 

 

*पपईची एक फोड, अर्ध केळं, पाऊण कप कोरफडीत पाणी घालून पातळ केलेला गर,

 पाऊण कप खोबर्‍याचं तेल घेऊन हे सर्व साहित्य एकत्र घुसळून त्याची मऊ पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांवर लावावी. वीस मिनिटांनी सौम्य स्वरूपाचा हर्बल शाम्पू वापरून केस धुवावेत. यामुळे केसांच्या मुळांचंही भरण-पोषण होतं. सोबत केस मऊ-मुलायम आणि चमकदार होतात. 

*ज्यांना आपल्या केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर हवं असेल त्यांनी कोरफडीचा ताजा गर काढून तो केसांना कंडिशनर म्हणून लावावा. कोरफडीचा ताजा गर हे केसांसाठी उत्तम कंडिशनर आहे.

First Published on: December 9, 2018 4:48 AM
Exit mobile version