तंदुरुस्त राहण्यासाठी ग्रीन कॉफी पिणे फायद्याचे

तंदुरुस्त राहण्यासाठी ग्रीन कॉफी पिणे फायद्याचे

बदलत्या आणि फास्ट जीवनशैलीमुळे आजकाल प्रत्येकाचेच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. या धावपळीत अवेळी नाश्ता करणे किंवा जेवणे यामुळे दिवसाचे वेळापत्रक बिघडून त्याचा परिणाम तब्येतीवर होते. ऑफिस, तसेच कामाच्या ठिकाणी खूपदा कॉफी, चहा होतो, अशावेळी त्यातील असणाऱ्या कॅफीन घटकामुळे शरिरावर विपरित परिणाम होताना दिसतो. परंतु, ग्रीन कॉफीच्या सेवनाने शरिरावर चांगले परिणाम होताना दिसतात.

अनियमित जेवणाच्या समस्येमुळे वजन नियंत्रणात राहत नसल्याने किंवा सतत जाणवत असल्याने ग्रीन कॉफी पिण्यास सुरूवात केल्यास या कॉफीचे आरोग्यावर चांगले परिणाम होताना दिसतात. ग्रीन कॉफीमध्ये असणारे घटक फक्त वजन कमी करत नाही तर तब्येत सुधारण्यासही मदत करतात.

ग्रीन कॉफीमुळे होणारे फायदे

ग्रीन कॉफी पिणे ठरेल फायदेशीर

दिवसातून एक दोन वेळा कॉफी पिणे योग्य आहे. पण त्यातील असणाऱ्या कॅफेनचे सेवन आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. अशावेळी ग्रीन कॉफी हा हेल्दी पर्याय आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी ग्रीन कॉफी पिणे फायद्याचे ठरले. ग्रीन कॉफी पिण्याचे आरोग्यदायी फायदे…

वजन नियंत्रित राहते

ग्रीन कॉफी बियांमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजे अधिक असल्याने शरीरातील पोषक तत्त्वांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे वजन नियंत्रित राहते.

मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत

ग्रीन कॉफी सेवनाने शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होऊन मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते.

सकरात्मक ऊर्जा वाढून मनही प्रसन्न राहते

ग्रीन कॉफीमध्ये असणाऱ्या क्रोनॉलोजीकल अॅसिड असते. ही कॉफी प्यायल्याने मेटाबॉलिज्म सुधारते. मेटाबॉलिज्म सुधारल्याने सकरात्मक ऊर्जा वाढीस लागून मनही प्रसन्न राहते.

रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रित

उच्च रक्तदाबामुळे हार्ट अॅटक, क्रॉनिक किडनी फेल्यूअर यांसारख्या समस्या वाढीस लागतात परंतु, ग्रीन कॉफीमुळे रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रित राहतो.

First Published on: June 11, 2019 8:30 AM
Exit mobile version