आयुष्य वाढविण्यासाठी वेगाने चाला

आयुष्य वाढविण्यासाठी वेगाने चाला

वेगाने चालण्याचे फायदे

बऱ्याचदा सांगितले जाते की, पायी चालल्याणे हे फायदे असते. अनेकजण चालण्याचे फायदे माहित असून देखील चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. दररोज वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते आणि वजन कमी होते. त्यामुळे अनेक आजार पळतात. मोठ्या संख्येने वयोवृद्ध चालताता मात्र, तरुणांनी पण याचा फायदा घ्यावा. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो. चला तर जाणून घेऊया वेगाने चालण्याचे फायदे

ब्रेन स्ट्रोक

दरोदर चालणे हे आरोग्यासाठी उत्तम असते. मात्र, काही कारणास्तव दररोज चालणे शक्य नसल्यास आठवड्यातून दोन तास तरी चालावे. यामुळे ब्रेन स्ट्रोकची शक्यता ३० टक्क्यांनी कमी होते.

हार्ट अटॅक

दररोज ३० ते ६० मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते. त्यामुळे दररोज वेगाने चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे.

मधुमेह

न चुकता दररोज ३० ते ४० मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका २९ टक्के कमी होतो.

डिप्रेशन

सकाळच्या वेळेस दिवसातून ३० मिनिटे वेगाने चालावे. यामुळे डिप्रेशनची शक्यता ३६ टक्के कमी होते.

जाडेपणा कमी होतो

अनेकजन बारीक होण्यासाठी दररोज चालायला जातात. मात्र, रोज कमीत कमी १ तास झपझप चालल्याने जाडेपणा कमी होतो आणि त्यासोबतच फ्रेश देखील वाटते.

शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा

सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.

मानसिक व्यायाम

चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक आणि मानसिक व्यायामही होतो.

First Published on: December 19, 2019 6:45 AM
Exit mobile version