Health Care Tips : लाल केळ्यांच्या सेवनाने शरीर होतंय सुदृढ ; जाणून घ्या फायदे

Health Care Tips : लाल केळ्यांच्या सेवनाने शरीर होतंय सुदृढ ; जाणून घ्या फायदे

Health Care Tips : लाल केळ्यांच्या सेवनाने शरीर होतंय सुदृढ ; जाणून घ्या फायदे

हल्लीच्या धावपळीच्या जीवनात ओरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. आरोग्य नेहमी सुदृढ राहण्यासाठी आपण आपल्या आहारात नेहमीच पोष्टीक पदार्थांचा समावेश करत असतो. फळांमधून आपल्या शरीराला अनेक जीवनसत्त्व मिळत असतात. फळांमध्ये विशेषत: केळ्यांचा समावेश असल्यास शरीराचे आरोग्य सुधारण्याबरोबर त्वचेचा तजेलपणा वाढवण्यासाठीही केळी गुणकारी ठरत असतात. त्यासाठी तुम्ही आतापर्यंत पिवळी केळी खात असाल मात्र लाल केळ्यांचा आस्वाद कधी घेतला आहे का? जाणून घ्या काय आहे या लाल केळ्यांचे फायदे.

जाणून घ्या लाल केळ्यांचे फायदे

कुठे मिळतात ही ‘लाल केळी’

लाल केळी ही लालसर- जांभळ्या रंगाची असून, ही केळी पिकल्यावर त्यांच्या सालांचा रंग हा फिकट गुलाबी रंगाचा होतो. ही केळी साधारण केळयांपेक्षा मृदू आणि गोड असतात. या केळ्यांचे उत्पादन हे पूर्व आफ्रिका,दक्षिण अमेरिका ,युएई या देशांत होते.मध्य अमेरिकेत या लाल केळ्यांचे उत्पादन जास्त होत असून,ही लाल केळी जगभरात कुठेही मिळतात.ही लाल केळी मुबईमधील मांटूंग्यातील भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. ही लाल केळी आपल्या शरीरासाठी गुणकारी ठरत असून, तमिळ,तेलगू भागातील लोक या लाल केळ्यांचा आपल्या आहारात समावेश करतात. विकी – कतरीनाच्या लग्नातील जेवणातही लाल केळ्यांच्या मेन्यूचा समावेश होता.


हे ही वाचा – Nutrition Tips: ब्रँडी, रम नाही तर ‘हे’ पेय ठेवेल हिवाळ्यात शरीर उष्ण


 

 

First Published on: December 27, 2021 12:48 PM
Exit mobile version