Monday, May 6, 2024
घरमानिनीWatermelon Vs Melon : उन्हाळ्यात काय खावं कलिंगड की खरबूज?

Watermelon Vs Melon : उन्हाळ्यात काय खावं कलिंगड की खरबूज?

Subscribe

उन्हाळ्याच्या हंगामात टरबूज आणि खरबूज खाणे अनेकांना आवडते. आजकाल दोन्ही फळे आपापल्या परीने अनेक गुणांनी समृद्ध आहेत, अशामध्ये तज्ज्ञ उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी आणि फळं खाण्याचा सल्ला देतात. फळांमध्ये कलिंगड हे सर्वाधिक पाणीदार फळ आहे. त्याशिवाय टरबूज आणि संत्री यातूनही आपल्या शरीराला पाणी मिळतं. मग उन्हाळ्यात टरबूज की खरबूज नेमकं कुठलं फळं जास्त फायदेशीर आहे. असा प्रश्न सर्वसामान्यांना अनेक वेळा पडतो. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या दोन फळांपैकी कोणते फळ शरीराला जास्त फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊया.

टरबूज कि खरबूज काय खाणे चांगले?

टरबूज किंवा खरबूजच्या पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाल्यास, कॅलरींचा उल्लेख करणे देखील खूप महत्वाचे आहे. एकीकडे 100 ग्रॅम टरबूजमध्ये 30 कॅलरीज असतात, तर 100 ग्रॅम खरबूजमध्ये 28 कॅलरीज दिसतात. दोघांमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण फरक नाही आणि कॅलरीजचे हे प्रमाण खूपच कमी आहे.

- Advertisement -

टरबूज (कलिंगड) खाण्याचे फायदे

  • टरबूज हृदयासाठी फायदेशीर
  • शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते
  • दृष्टी सुधारते
  • किडनीचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत
  • सनबर्नपासून सुटका मिळते

खरबूज खाण्याचे फायदे

  • डिहायड्रेशनपासून दूर ठेवण्यास मदत
  • वजन कमी होते
  • हृदयासाठी फायदेशीर
  • पचनशक्ती मजबूत करण्यास मदत
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवते
  • रक्तदाब नियंत्रणात ठेवते

हेही पहा :

उन्हाळ्यात कोणते जास्त हायड्रेटिंग आहे?

टरबूज विरुद्ध खरबूज यात नेमकं कोणतही फळ बाजी मारत नाही. दोन्ही फळं उन्हाळ्यात आपल्याला फायदेशीर आहेत. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण थोडे जास्त असतं, तर खरबूजमध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. हे दोन्ही फळं उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

दोन्ही एकत्र सेवन करता येईल का?

उन्हाळ्यात ही दोन्ही फळे मुबलक प्रमाणात घरी आणली जातात. अशा स्थितीत लोकांमध्ये अनेकदा गोंधळ होतो की दोन्ही एकत्र सेवन करता येईल का, मग या दोन्हीचे सेवन सकाळी किंवा दुपारी करणे योग्य मानले जाते. पण तुम्ही त्यांचे सेवन रात्री केले तर मग ते आरोग्यासाठी चांगले नाही. दोन्ही फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे ते पचायला वेळ लागतो. याशिवाय, हे देखील लक्षात ठेवा की ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा.

- Advertisement -

 

- Advertisment -

Manini