Health Tips : आरोग्यासाठी ‘दालचिनी’ ठरते उपयुक्त ; जाणून घ्या फायदे

Health Tips : आरोग्यासाठी ‘दालचिनी’ ठरते उपयुक्त ; जाणून घ्या फायदे

Health Tips : आरोग्यासाठी 'दालचिनी' ठरते उपयुक्त ; जाणून घ्या फायदे

प्रत्येकजण जेवणामध्ये दालचिनीचा वापर करत असतो.या दालचिनी आणि तमालपत्रामुळेच जेवण अधिक रुचकर होत असते.मात्र दालचिनी आणि तमालपत्र याचे आरोग्यासाठी बरेच फायचे आहेत. तमालपत्र असो किंवा दालचिनी, त्यांना आयुर्वेदिक औषधी वनस्पती देखील म्हणतात. ते सर्व प्रकारच्या औषधांमध्ये सामान्यतः वापरले जातात. तमालपत्रमध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असते आणि दालचिनीमध्ये अॅंटी-बॅकक्टेरीअल गुण मोठ्या प्रमाणात असतात.त्यामुळे कोणत्याही आजाराच्या इंफेक्शनपासून आपण दूर राहू शकतो. तमालपत्र आणि दालचिनीचा चहा प्यायल्याने त्याचा आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो.

तमालपत्र देखील रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. वास्तविक, तमालपत्रात साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचा गुणधर्म असतो. दालचिनी आणि तमालपत्रात फायटोकेमिकल्स आढळतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करू शकतात.

तमालपत्र आणि दालचिनीचे मिश्रण वजन कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. वास्तविक, शरीरातील चयापचय वाढवण्यासाठी ते फायदेशीर आहे. तसेच त्याचा चहा प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर पडते. अशा परिस्थितीत वजन कमी करायचे असेल तर तमालपत्र आणि दालचिनीपासून तयार केलेला चहा घ्या.

प्रथम एका पॅनमध्ये १ लिटर पाणी घ्या. पाणी चांगले उकळवा. पाण्याला चांगली उकळी आली की त्यात तमालपत्र आणि दालचिनी घाला. यानंतर, झाकून ठेवा आणि सुमारे १५ मिनिटे पाणी उकळवा. पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करा. यानंतर काचेच्या बाटलीत पाणी गाळून साठवा. हे पाणी दिवसभर प्यावे. यामुळे तुमच्या शरीराचे वजन कमी होऊ शकते. तसेच इतर समस्या दूर होऊ शकतात.जर हे दालचिनीने तुम्हाला कोणतीही अॅलर्जी होत असेल तर,त्याचे सेवन करणे बंद करा.डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करा.


हे ही वाचा – Beauty Tips : पार्लरमध्ये जायला वेळ नाही, मग घरातच करा मिनी फेशिअल


 

 

First Published on: December 6, 2021 9:10 PM
Exit mobile version