आरोग्यदायी गुळ

आरोग्यदायी गुळ

Jaggery

थंडीच्या दिवसात गुळ खाणे सर्वांना आवडते कारण गुळात गर्मी जास्त असते. गुळ खाल्ल्याने शरीरात गर्मी वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गुळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. आयुर्वेदानुसार गुळातील तत्वांमुळे शरीरातील अ‍ॅसिड नाश पावते. रोज गुळ खाल्ल्याने तुमचे स्वास्थ्य उत्तम राहते. चला तर मग जाणून घेऊया गुळाचे कमालीचे फायदे.

रोज गुळ खाल्ल्याने होणारे फायदे-
* रोज गुळ खाल्ल्याने पचन क्रिया सुरळीत राहते , तसेच तुमच्या पोटात कधीच गॅस होणार नाही.
* गुळ महिलांच्या मासिक पाळीतही फायदेशीर ठरतो. मासिकपाळी आल्यावर पोट दुखी होते अशात गुळ खाल्ला तर पोट दुखायचे त्वरित थांबेल.
* रोज गुळाचे सेवन केल्याने त्वचेला तेज येते आणि चेहर्‍यावरील पुरळ सुद्धा कमी होऊ लागतात.
* सर्दी, खोकला येत असेल तर गुळाचा लाडू बनवून किंवा चहामध्ये गुळ टाकून प्यायल्याने आराम मिळतो.
* गुळ खाल्ल्याने तुम्हाला थकवा कधीच नाही जाणवणार आणि शरीरात नेहमी ऊर्जा राहील.
* गुळात कुठल्याही अ‍ॅलर्जी विरुद्ध लढणारी तत्व असतात आणि दम्याच्या पेशंटला त्याचा खूप फायदा होतो.
*गुळाला आल्यासोबत गरम करून खाल्ल्याने गळ्याचे आजार दूर होतात.

गरम दुधाबरोबर गूळ खायचे फायदे-
* गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठ्यातला मोठा आजारही बरा होऊ शकतो. रोज दुध प्यायल्याचे फायदे तसे सगळ्यांनाच माहिती आहेत, पण गरम दुधाबरोबर गूळ खाल्ल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहतं, तसंच त्वचेला निखार येतो. दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि डी तसंच कॅल्शियम, प्रोटीन आणि लॅक्टिक अ‍ॅसिड असतं. तर गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज, कॅल्शियम, फॉस्फरस, लोखंड असतं.

शरीरातलं अशुद्ध रक्त साफ होतं
गुळामध्ये असलेल्या गुणांमुळे शरिरातील अशुद्ध रक्त शुद्ध होतं. त्यामुळे गरम दूध आणि गूळ खाल्ल्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता.

लठ्ठपणा नियंत्रणात ठेवतं
गरम दुधामध्ये साखर घालण्याऐवजी गूळ घातला तर लठ्ठपणा नियंत्रणामध्ये राहायला मदत होते.

पोटाचे विकार दूर करतं
गरम दूध आणि गुळाचं सेवन केल्यामुळे पोटाचे आणि पचनाचे विकार दूर होतात.

सांधेदुखी वर लाभदायी
गूळ खाल्ल्यामुळे सांधेदुखीला आराम मिळतो. रोज गूळ आणि आल्याचा तुकडा एकत्र करुन खाल्ला तर सांधे मजबूत होतात.

त्वचा होते मुलायम
गरम दूध आणि गूळ खाल्ल्यामुळे त्वचा मुलायम होते. एवढंच नाही तर यामुळे केसही मजबूत होतात.

First Published on: December 10, 2018 5:31 AM
Exit mobile version